• Download App
    उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा बाजी मारणार, काँग्रेस होणार भुईसपाट; भाजपला २२५-२३७ जागा तर सपाला १३९-१५१ जागा|In Uttar Pradesh, BJP will win again, Congress will be level; BJP has 225-237 seats and SP has 139-151 seats

    उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा बाजी मारणार, काँग्रेस होणार भुईसपाट; भाजपला २२५-२३७ जागा तर सपाला १३९-१५१ जागा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा बाजी मारणार असल्याचे निवडणूकपूर्व सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेशात खरा सामन सपा-भाजपतच रंगणार असून काँग्रेस भुईसपाट होणार आहे, असे अंदाजात म्हंटले आहे. एकूण ४०३ जागांसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे.In Uttar Pradesh, BJP will win again, Congress will be level; BJP has 225-237 seats and SP has 139-151 seats

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास उरले आहेत.मतदानापूर्वी झालेल्या शेवटच्या ओपिनियन पोलच्या निकालावरून मुख्य लढत भाजप आणि सपा यांच्यात आहे. भाजपला २२५-२३७ जागा तर सपाला १३९-१५१ जागा मिळू शकतात.



     

    बसपाला १३-२१ जागा आणि काँग्रेसला ४-८ आणि इतरांना २-६ जागा मिळू शकतील, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे.पश्चिम उत्तर प्रदेशातील १३६ जागांपैकी भाजप ७१-७५ जागा, तर सपा ५०-५४ जागा जिंकू शकतो.

    बसपाला ८-१० जागा मिळू शकतील, तर काँग्रेसला १-३ जागा मिळतील. इतरांना ०-१ जागा मिळतील, असा अंदाज आहे.उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. नंतर १४, २०,२३, २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च, ७ मार्च असं सात टप्प्यांत मतदान होणार आहे.

    In Uttar Pradesh, BJP will win again, Congress will be level; BJP has 225-237 seats and SP has 139-151 seats

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Airlines : सीटवर अतिरिक्त शुल्क न आकारण्यावर विमान कंपन्यांचा विरोध; म्हटले- विमान भाडे वाढवावे लागेल

    TMC Manifesto : ममतांची घोषणा- SC-ST महिलांना दरमहा ₹1700, इतरांना ₹1500 मिळणार, जाहीरनाम्यात पक्क्या घरांचे आश्वासन

    Air India : एअर इंडियाने दिल्लीहून कॅनडाला चुकीचे विमान पाठवले; 7 तासांनंतर चीनच्या हवाई हद्दीतून परतले