प्रतिनिधी
अयोध्या : दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनगरी अयोध्या दीपोत्सवासाठी सज्ज झाल्याचे दिसतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दीपोत्सवाचा एक भाग म्हणून आज (रविवार) प्रभू रामाची अयोध्या आणखी एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार करणार आहे. In the presence of Prime Minister Modi, Ayodhya is ready for a world record with 18 lakh pilgrims
उत्तर प्रदेशच्या अयोध्या जिल्ह्यात म्हणजेच रामजन्मभूमीवर साधारण 18 लाख मातीचे दिवे लावण्याची तयारी पूर्ण झाली आहे. दीपावलीच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या या कार्यक्रमाची भव्य व्यवस्थाही करण्यात आली आहे. सलग सहाव्या वर्षी अयोध्येच्या दीपोत्सवाच्या नावावर आणखी एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद होणार आहे.
अयोध्या नगरीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. रविवारी म्हणजे आज अयोध्येमध्ये दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. मोदी यांच्या उपस्थितीत दीपोत्सवात फटाके, लेझर शो आणि रामलीला रंगणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोदी शरयू किनार्यावरील राम की पैडी येथे भव्य संगीत लेझर शोसह 3-डी होलोग्राफिक प्रोजेक्शन मॅपिंग शोचे साक्षीदार होतील.
22 हजारांहून अधिक स्वयंसेवक शरयूच्या किनारी राम की पौडी येथे 15 लाख मातीचे दिवे लावतील. उर्वरित महत्त्वाच्या चौक आणि इतर ठिकाणीही दिव्यांची रोषणाई करण्यात येणार आहे. स्वयंसेवक एका चौकात 256 मातीचे दिवे लावतील आणि दोन चौकांमधील अंतर सुमारे दोन ते तीन फूट असेल. लेझर शो, थ्रीडी प्रोजेक्शन मॅपिंग शो आणि फटाक्यांची अतिषबाजी देखील असणार आहे. यासह वाळूंचे शिल्प देखील साकारले आहेत.
In the presence of Prime Minister Modi, Ayodhya is ready for a world record with 18 lakh pilgrims
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरे यांच्या आजच्या मराठवाडा दौऱ्यापूर्वी आणि दौऱ्यानंतर राजकारण बेरजेचं की वजाबाकीचं?
- ऐतिहासिक ताजमहाल होणार अतिक्रमण मुक्त; सीमेअंतर्गत 500 मीटर व्यवसाय बंदी करणार लागू
- गुमनामी बाबा की नेताजी? : गुमनामी बाबांचा DNA रिपोर्ट सार्वजनिक करायला केंद्रीय फॉरेन्सिक लॅबचा नकार
- फोडा – फोडी, बुडवा – बुडवी राजी – नाराजी; ही तर महापालिका निवडणुकांपूर्वीची खडाखडी