• Download App
    Kanimozhi स्पेनमध्ये विचारले गेले भारताची राष्ट्रभाषा कोणती?

    Kanimozhi : स्पेनमध्ये विचारले गेले भारताची राष्ट्रभाषा कोणती? अन् कनिमोळींच्या उत्तराने जिंकली सर्वांचं मनं

    Kanimozhi

    जाणून घ्या, असे नेमके काय उत्तर दिले आहे कनिमोळी यांनी


    विशेष प्रतिनधी

    नवी दिल्ली : Kanimozhi  सध्या भारतातील अनेक नेते ऑपरेशन सिंदूर का आवश्यक होते हे सांगण्यासाठी आणि याबरोबहरच पाकिस्तानच्या दहशतवादाचा पर्दाफाश करण्यासाठी अनेक देशांमध्ये गेलेले आहेत. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर नंतर भारताच्या संपर्क कार्यक्रमाचा भाग म्हणून स्पेनला गेलेल्या एका भारतीय शिष्टमंडळाच नेतृत्व द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी करत आहेत.

    माद्रिदमधील भारतीय डायस्पोराच्या एका सदस्याने त्यांना भारताच्या राष्ट्र भाषेबद्दल प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ‘’भारताची राष्ट्रीय भाषा एकता आणि विविधता आहे. हाच संदेश हे शिष्टमंडळ जगाला देते आहे आणि हीच आजची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.’’



    दहशतवादाविषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, आमच्या देशात बरेच काही करायचे आहे आणि आम्हाला ते करायचे आहे. दुर्दैवाने, आपली दिशाभूल केली जात आहे. आपल्याला दहशतवाद, युद्ध यासारख्या गोष्टींना सामोरे जावे लागत आहे जे पूर्णपणे अनावश्यक आहे. शिवाय, त्या म्हणाल्या की भारत एक सुरक्षित ठिकाण आहे आणि सरकार काश्मीर देखील सुरक्षित राहील याची खात्री करेल.

    त्या पुढे म्हणाल्या की, भारतीय म्हणून आपल्याला हा संदेश स्पष्ट करावा लागेल की भारत सुरक्षित आहे. ते काहीही करू शकतात, मात्र ते आपल्याला मार्गावरून हटवू शकत नाहीत. आम्ही काश्मीर सुरक्षित राहील याची खात्री करू.

    कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या पाच देशांच्या दौऱ्याचा शेवटचा टप्पा स्पेन आहे, त्यानंतर शिष्टमंडळ भारतात परतेल. या शिष्टमंडळात समाजवादी पक्षाचे खासदार राजीव कुमार राय, भाजपचे ब्रिजेश चौटा, आम आदमी पक्षाचे अशोक मित्तल, राजदचे प्रेमचंद गुप्ता आणि माजी राजनयिक मंजीव सिंग पुरी यांचा समावेश आहे.

    In Spain a question was asked about Indias national language and Kanimozhi’s answer won everyone’s hearts

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये 21-40 वयोगटातील बेरोजगारांना ₹1500 मिळतील; कर्मचाऱ्यांचा DA 4% वाढला; 4.06 लाख कोटी रुपयांचे अंतरिम बजेट सादर

    मोहब्बत की दुकान खोलून बसलेल्यांना मोदींची कबर खोदायला निघालेत!!, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यसभेतून घणाघात

    Saif al-Islam Gaddafi : लिबियाचे माजी हुकूमशहा गद्दाफींच्या मुलाची हत्या; घरात घुसून गोळी मारली; निवडणूक लढण्याची तयारी करत होते