• Download App
    पंजाबमध्ये बड्या व्यक्तींच्या हत्येचा कट फसला, चार दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक! In Punjab the conspiracy to kill big people failed four terrorists arrested with weapons

    पंजाबमध्ये बड्या व्यक्तींच्या हत्येचा कट फसला, चार दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक!

    या दहशतावाद्यांनी अगोदर रेकी देखील केली होती.

    विशेष प्रतिनिधी

    चंडीगढ : पंजाब पोलिसांनी टार्गेट किलिंग करून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कट रचणाऱ्या एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि खलिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) च्या चार दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक केली. हे चौघेही पाकिस्तानात दडलेल्या केएलएफ दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा यांच्या जवळचे आहेत.  In Punjab the conspiracy to kill big people failed four terrorists arrested with weapons

    अमेरिका स्थित इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनचे (ISYF) दहशतवादी आणि हरप्रीत सिंह उर्फ हॅप्पी ऑपरेट करत होता.  त्यांच्या निशाण्यावर पंजाबमधील काही बडे व्यक्ती होते आणि १५ लाख रुपयांमध्ये हत्येचा सौदा झाला होता.

    विक्रमजीत सिंग उर्फ ​​राजा बैंस रा. बटाला, बावा सिंग रा. लुधर (अमृतसर), गुरकिरपाल सिंग उर्फ ​​गगन रंधावा आणि अमानत गिल दोघेही अमृतसरचे रहिवासी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून .32 बोअरचे पिस्तूल आणि 10 काडतुसे जप्त केली आहेत. डीजीपी गौरव यादव यांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध यूएपीए आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    रिंडा आणि हॅप्पी यांनी राज्यातील काही प्रमुख व्यक्तींच्या सुनियोजित हत्येचा कट रचल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर राज्य स्पेशल ऑपरेशन सेल मोहालीच्या पथकाने विशेष कारवाई केली. यानंतर विक्रमजीत उर्फ ​​राजा बैंस आणि बावा सिंग यांना ताब्यात घेण्यात आले. हॅपीने टार्गेट किलिंगसाठी विक्रमजीतसोबत १५ लाख रुपयांचा सौदा केल्याचे तपासात समोर आले आहे. ही घटना घडवून आणण्यासाठी विक्रमजीतने सप्टेंबर २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात रेकीही केली होती.

    In Punjab the conspiracy to kill big people failed four terrorists arrested with weapons

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??