• Download App
    पंजाबमध्ये चार मंत्री, आमदारांचे अमरिंदरसिंगांविरोधात बंड, कॅप्टनवर विश्वास नाही|In Punjab, four ministers, MLAs revolt against Amarinder Singh, do not trust the captain

    पंजाबमध्ये चार मंत्री, आमदारांचे अमरिंदरसिंगांविरोधात बंड, कॅप्टनवर विश्वास नाही

    विशेष प्रतिनिधी

    चंदीगढ : पंजाबमधील कॉँग्रेसमधील धुसफूस थांबण्याची चिन्हे नाहीत. 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यावर विश्वास राहिलेला नाही, असे स्पष्ट करीत पंजाबमधील चार मंत्री आणि काही आमदारांनी त्यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकावला आहे.In Punjab, four ministers, MLAs revolt against Amarinder Singh, do not trust the captain

    अमरिंदरसिंग यांच्याविरोधात बंड करणाºया मंत्र्यांमध्ये तृप्त राजिंदरसिंग बाजवा, सुखविंदरसिंग सरकारिया, सुखजिंदरसिंग रंधवा आणि चरणजितसिंह चन्नी यांच्यासह 24 आमदारांचा समावेश आहे. बाजवा यांच्या निवासस्थानी या मंत्री आणि आमदारांची मंगळवारी बैठक झाली.



    काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली असून, त्यांना राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली जाईल, असे बाजवा यांनी सांगितले. पंजाबमध्ये मोठे पाऊल उचलण्याची गरज असून, मुख्यमंत्री बदलणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

    काही मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत मागील विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण न झाल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आल्याचे चन्नी यांनी या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

    2015 मध्ये धार्मिक ग्रंथांचा झालेला अपमान, मादकपदार्थांच्या तस्करीतील बड्या माशांना अद्याप न झालेली अटक आणि वीज खरेदी करार रद्द करण्याच्या आश्वासनांचा यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात बाजवा, सरकारिया, रंधवा आणि पंजाब काँगह्येसचे सरचिटणीस परगतसिंह पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे नेते अमरिंदरसिंग यांचे विरोधक मानले जातात.

    In Punjab, four ministers, MLAs revolt against Amarinder Singh, do not trust the captain

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य