वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असून 30 हजारांच्या आत आला. सोमवारी तब्बल 48 हजार 211 जणांना घरी सोडले. तर 26 हजार 616 रुग्णांची नोंद झाली. 516 कोरोना रुग्णांची मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. In Maharashtra Big drop in number of Coronavirus patients, discharge of 48,000 people
मुंबईत रुग्णसंख्येत घट
मुंबईत 1240 रुग्णांची नोंद झाली तर 2587 जणांना डिस्चार्ज दिला. 48 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 34 हजार 288 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 6,89,936 रुग्णसंख्या झाली. पैकी 6,39,340 रुग्ण घरी गेले आहेत. तर 14 हजार 308 जण मरण पावले आहेत.
पुणे शहरात कमालीची घट
पुणे शहरात 684 रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 4 लाख 59 हजार 987 झाली. दिवसभरात 2 हजार 790 रुग्णांना डिस्चार्ज दिला असून एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 33 हजार 798 झाली आहे.
दिवसभरात 7 हजार 862 टेस्ट
पुणे शहरात एकाच दिवसात 7 हजार 862 नमुने घेतले आहेत. एकूण टेस्ट संख्या 23 लाख 72 हजार 34 झाली. 18 हजार 440 रुग्णांपैकी 1402 रुग्ण गंभीर तर 5,287 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
नव्याने 43 जणांचा मृत्यू
पुणे महापालिका हद्दीत नव्याने 43 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांची एकूण संख्या 7 हजार 749 झाली आहे. दरम्यान, लसींचा पुरवठा न झाल्याने मंगळवारी ( ता. 18) पुणे महापालिका हद्दीतील सर्व कोरोना लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत.
राज्यातील आकडेवारी
- 24 तासांत मृत्यू : 516
- नवीन रुग्ण : 26,616
- बरे : 48,211
- एकूण रुग्णसंख्या : 54,05,068
- एकूण बरे : 48,74,582
- एकूण मृत्यू : 82 हजार 486
- सक्रीय रुग्ण : 4,45,495
In Maharashtra Big drop in number of Coronavirus patients, discharge of 48,000 people
महत्वाच्या बातम्या
- प्रायव्हसी पॉलिसी कायद्यानुसारच असल्याचे व्हॉट्सअॅपचे न्यायालयात स्पष्टीकरण, पालन केले नाही तर अकाऊंट नष्ट केले जाणार
- भारतातील लसीकरणाविरुध्द षडयंत्र : डॉ. शाहिद जमील यांचा राजीनामा आणि जेकब पुलियल यांची लसीविरुध्द याचिका
- लोकांना धीर देण्याऐवजी विरोधक घाबरवत आहेत, योगी आदित्यनाथ यांचा आरोप
- पर्यावरणाचा विचार करायला गेला अन् १५ लाखांच्या हिऱ्याची अंगठी देऊनही मैत्रिणीला गमावून बसला