वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि लष्करी जवान यांच्या चकमक सुरू असून त्यात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. एक अधिकारी हुतात्मा झाला असून ५ जवान जखमी झाले आहेत. In Jammu and Kashmir 2 terrorists killed; One officer killed, 5 injured
सुंजवानमध्ये पाच तासांपासून चकमक सुरू आहे. पहाटेच्या सुमारास सुंजवान कॅम्पजवळ दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला होता. जवानांचा बस ड्युटीवर असताना हा हल्ला झाला. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांना पळून जाण्यास भाग पाडले. कारवाईदरम्यान ASI एसपी पटेल हुतात्मा झाले, तर ५ जवान गंभीर जखमी झाले आहेत.
दुसरीकडे, बारामुल्लामध्ये झालेल्या चकमकीत ४ दहशतवादी ठार झाले आहेत. लश्कर-ए-तोएबाचा (एलईटी) प्रमुख कमांडर युसूफ कंत्रूसह तीन दहशतवाद्यांना ठार केले. शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. बारामुल्लामध्येही चकमक सुरू आहे.