पाचव्या आरोपपत्रात संघटनेच्या नेत्यांसह १९ जणांवर आरोप करण्यात आले आहेत.
प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)कडून प्रतिबंधित संघटना PFIची देशभरातील पाळमुळं शोधून कारवाई करण्याचे काम सुरू आहे. महिनभरातच पीएफआय विरोधात एनआयए कडून पाचवं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या महिन्यात PFI विरुद्धच्या पाचव्या आरोपपत्रात NIA ने १९ जणांवर आरोप दाखल केले आहेत. ज्यामध्ये १२ राष्ट्रीय कार्यकारी परिषद (NEC) सदस्य, संस्थापक सदस्य आणि संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. In its fifth chargesheet this month against PFI the NIA has filed charges against 19 persons
याशिवाय, PFI वर देशाला अस्थिर करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. NIA ने PFI ची ३७ बँक खाती तसेच PFI शी संबंधित १९ व्यक्तींची ४० बँक खाती गोठवली आहेत. ज्यामुळे संघटनेच्या हालचालीला अक्षरशा खीळ बसली आहे.
गुवाहाटी (आसाम), सुंदीपूर (पश्चिम बंगाल), इंफाळ (मणिपूर), कोझिकोड (केरळ), चेन्नई (तामिळनाडू), नवी दिल्ली, जयपूर (राजस्थान), बंगळुरू (कर्नाटक), हैदराबाद (तेलंगणा) आणि कुर्नूल (आंध्र प्रदेश) यासह संपूर्ण भारतात या बँक खात्यांवर कारवाई करण्यात आली.
In its fifth chargesheet this month against PFI the NIA has filed charges against 19 persons
महत्वाच्या बातम्या
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने जारी केले अटक वॉरंट!
- फरार बुकी अनिल जयसिंघानियाचा उद्धव ठाकरे यांच्या बरोबरचा फोटो व्हायरल; पण तो नेमका केव्हाचा??
- विरोधी ऐक्याची कोलकत्यात चर्चा; कर्नाटकात काँग्रेसचा ऐक्याला सुरूंग!!
- नवीन पेन्शन योजनेत शिंदे – फडणवीस सरकार करणार सुधारणा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय