विशेष प्रतिनिधी
पणजी : गोव्यातील बांबोळी येथे वेळेत ऑक्सिजन न मिळाल्यामुळे 21 रुग्णाचा मृत्यू झाला. येथील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात हा प्रकार घडला. बुधवारी पहाटे दोन ते सहा या वेळेत २१ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला.In Goa 21 paitaint died due to lack of oxygen
मंगळवारी मध्यरात्री नंतर बांबोळीच्या इस्पितळातील १२२ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठ्यात समस्या निर्माण झाली. ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्ण अस्वस्थ होऊ लागले.
रुग्णांच्या काही नातेवाइकांनी आरोग्य मंत्र्याना मेसेज पाठवले व मदतीची विनंती केली होती. मध्यरात्री नंतर ऑक्सिजन समस्या का निर्माण होते व बळी का जातात याची न्यायालयाने चौकशी करावी अशी मागणी आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी केली आहे.
In Goa 21 paitaint died due to lack of oxygen