• Download App
    इम्रान खान राजकीय डावात क्लीन बोल्ड शाहबाज शरीफ पाकचे नवे पंतप्रधान ? |Imran Khan clean bold in political innings Shahbaz Sharif new Prime Minister of Pakistan?

    इम्रान खान राजकीय डावात क्लीन बोल्ड शाहबाज शरीफ पाकचे नवे पंतप्रधान ?

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या राजकीय गदारोळात इम्रान खान आज राजकीय डावात क्लीन बोल्ड झाले. इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावावर मतदान प्रक्रिया संपल्याने त्यांचे सरकार पडले. अविश्वास प्रस्तावावरील मतदानात इम्रान यांच्या विरोधात १७४ मते पडली आणि शाहबाज शरीफ यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Imran Khan clean bold in political innings Shahbaz Sharif new Prime Minister of Pakistan?

    मतमोजणी पूर्ण झाली. विरोधकांना १७४ मते मिळाली. त्यामुळे इम्रान खान यांचे सरकार पडले आहे. विशेष म्हणजे ३४२ सदस्यीय विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी १७२ सदस्यांची आवश्यकता असते. विरोधकांना १७४ मते मिळाल्याने शाहबाज शरीफ यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शाहबाज शरीफ हे तीन वेळा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री राहिले आहेत.



    शाहबाज शरीफ यांनी नॅशनल असेंब्लीला संबोधित केले अविश्वास ठरावावरील मतदान जिंकल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी नॅशनल असेंब्लीत भाषण केले. शाहबाज शरीफ म्हणाले की, आज अल्लाहने पाकिस्तानच्या लोकांच्या प्रार्थना स्वीकारल्या आहेत. पाकिस्तानात अशी उदाहरणे क्वचितच पाहायला मिळतात. ते म्हणाले की, “आम्ही निरपराध लोकांना तुरुंगात टाकणार नाही. आम्ही कोणाचाही बदला घेणार नाही. पाकिस्तानचे दुःस्वप्न संपले आहे. पाकिस्तानमध्ये हसण्याचे दिवस परत आले.”

    Imran Khan clean bold in political innings Shahbaz Sharif new Prime Minister of Pakistan?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट