वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातल्या सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये त्याचबरोबर महत्त्वाच्या संस्थांमध्ये नागरी संरक्षणासंदर्भातल्या सर्व व्यवस्था चोख करा. त्यासाठी आवश्यक ती mock drills 7 मे रोजी घ्या, असे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने आज सर्व राज्यांना जारी केले.Improve all civil defense systems, conduct mock drills to protect against attacks;
पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाची शक्यता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशातले नागरी संरक्षण मजबूत राहावे या दृष्टीने गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना विशेष आदेश जारी केलेत.
यामध्ये हवाई हल्ल्याच्या पूर्वसूचना देणारे सायरन ऍक्टिव्हेट करणे, कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यासाठी नागरिकांची तयारी करणे त्यासाठी विद्यार्थी, तरुण, यांना विशेष प्रशिक्षण देणे, ब्लॅक आउटची mock drills करणे, अचानक हल्ला झाल्यास संबंधित जागेपासून नागरिकांना सुरक्षित स्थळी दूर नेण्याचा सराव करणे यांचा समावेश आहे.
याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण दलाच्या प्रमुखांच्या बैठकांचा सिलसिला जारी ठेवला. ते संरक्षण दलाच्या सर्व प्रमुखांना भेटले. त्याचबरोबर आज सायंकाळी राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयात पोहोचले होते.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना दिलेल्या आदेशांना विशेष महत्त्व आहे.
Improve all civil defense systems, conduct mock drills to protect against attacks; Important order from the Union Home Ministry to all states!!
महत्वाच्या बातम्या
- प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’
- Harshvardhan Sapkal बीडच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा: हर्षवर्धन सपकाळ यांची अपेक्षा
- Tejashwi Yadav : आता तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र!
- Ganga Expressway : हवाई दलाने रचला विक्रम : गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचे रात्रीचे लँडिंग