Election Commission : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग उद्या म्हणजेच २७ डिसेंबर रोजी महत्त्वाची बैठक घेणार आहे. भारतीय निवडणूक आयोग 27 डिसेंबर रोजी आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासह आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बैठकीत आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा होणार आहे. Important meeting of Election Commission tomorrow in view of assembly elections, many officials including Health Secretary will be present
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग उद्या म्हणजेच २७ डिसेंबर रोजी महत्त्वाची बैठक घेणार आहे. भारतीय निवडणूक आयोग 27 डिसेंबर रोजी आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासह आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बैठकीत आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा होणार आहे.
तीन दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाला कोरोनाची परिस्थिती पाहून विधानसभेच्या निवडणुका तूर्तास पुढे ढकलण्याची विनंती केली होती. यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांनी नंतरच्या आठवड्यात उत्तर प्रदेशचा दौरा करून आणि परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्याची घोषणा केली.
हायकोर्टाने म्हटले होते की, दुसऱ्या लाटेत लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आणि लोकांचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालमधील ग्रामपंचायत निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमुळे लोकांना खूप संसर्ग झाला आहे, ज्यामुळे लोक मरण पावले आहेत. आता यूपी विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. सर्व पक्ष रॅली, सभा घेऊन गर्दी जमवत आहेत, जिथे कोणत्याही प्रकारचा कोरोना प्रोटोकॉल शक्य नाही आणि तो वेळीच रोखला गेला नाही तर त्याचे परिणाम दुसऱ्या लाटेपेक्षा भयंकर होतील.
Important meeting of Election Commission tomorrow in view of assembly elections, many officials including Health Secretary will be present
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबान नियम : हिजाब नसेल आणि पुरुष नातेवाईक सोबत नसतील तर अफगाणिस्तान मधील स्त्रियांना प्रवास करण्यास मनाई
- विधानसभा अध्यक्ष निवडणूक “राजकीय गॅसवर”; भुजबळ, शिंदे, थोरात राज्यपालांना भेटले; उद्या राज्यपाल काय उत्तर देणार??
- अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन : गुजरातमध्ये ३५० किलोमीटरचे काम वेगात सुरू; मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांकडून पहाणी
- बर्फवृष्टी मुळे सिक्किम मधील चांगु तलाव परिसरात 1000 हुन अधिक पर्यटक अडकून पडले आहेत, आर्मी द्वारा रेस्क्यू ऑपरेशन सुरू
- ST Strike : आंदोलनाच्या तणावामुळे आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून केली आत्महत्या