• Download App
    आयएमए – रामदेवबाबा पुन्हा आमने सामने, देशद्रोहाचा खटला भरण्याची पंतप्रधानांना विनंती।IMA wrote letter to PM modi against Ramdev baba

    आयएमए – रामदेवबाबा पुन्हा आमने सामने, देशद्रोहाचा खटला भरण्याची पंतप्रधानांना विनंती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – कोरोना लसीकरणाबद्दल वादग्रस्त दावे करणारे व लशी घेऊनही हजारो डॉक्टर व लाखो नागरिक मृत्युमुखी पडल्याचा बेजबाबदार दावा करणारे योगगुरू रामदेव बाबा यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा. अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. IMA wrote letter to PM modi against Ramdev baba

    अॅंलोपॅथी आणि डॉक्टरांवर टीका केल्याने आयएमएने रामदेवबाबा यांच्यावर १ हजार कोटींच्या अब्रूनुकसानीचा खटला भरण्याची इशारा देणारी नोटीस त्यांना बजावली आहे.
    यामुळे रामदेवबाबा विरुद्ध आयएमए हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान प्रत्येक भाषणात लसीकरणाचे महत्त्व सांगत असतात. त्यामुळे ते अशाप्रकारची बेजबाबदार विधाने करणाऱ्यांवर कारवाई करतील.’’ अशी अपेक्षा आयएमएने व्यक्त केली आहे.



    देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असताना रामदेवबाबा सारखे लोक वेगवेगळी विधाने करून संभ्रम निर्माण करीत आहेत. रामदेव बाबा यांच्या वक्तव्यांचे त्यांच्या पाठिराख्यांवर विपरित परिणाम होवून त्याचे लसीकरणावरही परिणाम होवू शकताता असे मानले जाते. आएमएच्या मागमीनंतर आता केंद्र सरकार काय भूमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    IMA wrote letter to PM modi against Ramdev baba

    Related posts

    महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस; आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते मेट्रोचे उद्घाटन!!

    Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते