• Download App
    कोरोनाची तिसरी लाट कधीही येवू शकते, गाफील न राहण्याचा ‘आयएमए’चा इशारा। IMA warns for third wave

    कोरोनाची तिसरी लाट कधीही येवू शकते, गाफील न राहण्याचा ‘आयएमए’चा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना संसर्गाची तिसरी लाट उंबरठ्यावर असताना केंद्र आणि विविध राज्यांनी सुरक्षा उपाययोजना शिथिल करता कामा नये.’’ असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनने केले आहे. सार्वजनिक ठिकाणांवर यंत्रणेकडून जी मोकळीक दिली जात आहे, त्याबद्दल देखील संघटनेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. IMA warns for third wave



    जगातील आतापर्यंतच्या विविध साथींचा अभ्यास केला तर तिसरी लाट कधीही येऊ शकते. सार्वजनिक ठिकाणांवर होणारी लोकांची गर्दी आणि त्यांच्याकडून होणारे नियमांचे उल्लंघन याबाबी खरोखरच चिंताजनक असल्याचे मत आयएमएकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे.

    ‘‘ पर्यटन, यात्रा, सण आणि उत्सव या सगळ्या गोष्टी आवश्यलक असल्या तरीसुद्धा त्यासाठी आपण काहीकाळ नक्कीच वाट पाहू शकतो. लस न घेताच लोक अशा कार्यक्रमांत सहभागी होत असतील तर ते या संसर्गाचे सुपरस्प्रेडर ठरू शकतात.’’ अशी भीतीही आयएमएकडून व्यक्त करण्यात आली आहे.

    IMA warns for third wave

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India-US : द फोकस एक्सप्लेनर : भारत-अमेरिका व्यापारी फ्रेमवर्क: “Zero Tariff” म्हणजे काय आणि त्याचा सर्वसामान्यांवर काय अर्थ?

    Malegaon : मालेगावमध्ये इस्लाम पक्षाच्या नसरीन महापौर झाल्या, सपा उपमहापौरपदी

    Tragedy in Kota : कोटामध्ये 3 मजली इमारत कोसळली, अनेक जण दबले; रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणि कर्मचारी होते