• Download App
    Rahul Gandhi तुम्ही खरे भारतीय असता, तर असं बोलला नसतात; सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधींचे वाभाडे

    Rahul Gandhi तुम्ही खरे भारतीय असता, तर असं बोलला नसतात; सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधींचे वाभाडे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : तुम्ही खरे भारतीय असता, तर असलं बोलला नसतात, अशा परखड शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींचे वाभाडे काढले. भारतीय सैन्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने फटकारले. चीनने 2000 किलोमीटर जमीन बळकावल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता. पण खरा भारतीय असे कधीच म्हणणार नाही, असे म्हणत सुप्रीम कोर्टाने न्यायालयाने राहुल गांधींनी फटकारले. Rahul Gandhi

    भारतीय सैन्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला. सुप्रीम कोर्टाने लखनौ ट्रायल कोर्टाच्या समन्सला स्थगिती दिली. पण या प्रकरणात नोटीस बजावत उत्तर देखील मागितले

    तुम्ही जे विधान केले ते संसदेत का नाही केले? सोशल मीडियावर का म्हटले?, असा खडा सवालही न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी केला. तुम्ही जर खरे भारतीय असाल तर, तुम्ही हे म्हणायला नको होते? तुम्ही एक जबाबदार नेते असल्याचेही न्यायमूर्तींनी अधोरेखित केले. यावर ज्येष्ठ वकील सिंघवी म्हणाले की, जर विरोधी पक्षनेते म्हणून हे सर्व बोलू शकत नसतील तर, याचा काय परिणाम होईल?



    कोणताही खरा भारतीय असे म्हणणार नाही

    न्यायमूर्ती दत्ता म्हणाले की, चीनने 2000 चौरस किलोमीटरवर कब्जा केला हे तुम्हाला कसे कळले? तुम्ही तिथे होतात का? तुमच्याकडे विश्वसनीय माहिती काय आहे? एक खरा भारतीय हे बोलणार नाही. सीमेपलीकडे वाद असताना तुम्ही हे सर्व बोलू शकता का? तुम्ही संसदेत प्रश्न का विचारू शकत नाही?, अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी केली.

    न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधींना झापण्याची ही दुसरी वेळ ठरली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्या प्रकरणाच्या सुनावणीत देखील त्यांनी राहुल गांधींना छापले होते देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचा तुम्ही अपमान कसा करू शकता?, असा परखड सवाल त्यांना विचारला होता.

    If you were a true Indian, you wouldn’t have said this; Supreme Court reprimands Rahul Gandhi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Apple : अ‍ॅपलचे बाजारमूल्य पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्स पार; हे भारताच्या जीडीपीच्या बरोबर

    Siddaramaiah : सरकारी ठिकाणी RSS शाखा, बंदीच्या आदेशाला स्थगिती; कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सिद्धरामय्या सरकार खंडपीठात आव्हान देणार

    Delhi Police : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला दिल्लीतून अटक; अनेक वर्षांपासून गुप्तचर माहिती पाठवत होता