• Download App
    खासगी रुग्णालयात पैसे देण्याची तयारी असल्यास चार आठवड्यानंतरही घेऊ शकता लसीचा दुसरा डोस If you are willing to pay at a private hospital, you can take a second dose of the vaccine after four weeks

    खासगी रुग्णालयात पैसे देण्याची तयारी असल्यास चार आठवड्यानंतरही घेऊ शकता लसीचा दुसरा डोस

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोव्हिशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी ८४ दिवसांचे अंतर आहे. मात्र, खासगी रुग्णालयात कोणी जर पैसे देण्यास तयार असेल तर चार आठवड्यानंतरही दुसरा डोस घेऊ शकतो. केरळ उच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला असून कोविन पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. If you are willing to pay at a private hospital, you can take a second dose of the vaccine after four weeks

    सध्या देशात कोविशील्ड, कोव्हॅक्सिन, स्पुतनिक या लसी दिल्या जात आहेत. कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांची प्रतिक्षा करावी लागते. मात्र, एका प्रकरणात सुनावणीदरम्यान केरळ उच्च न्यायालयाने हे अंतर चार आठवड्याचे होऊ शकते, असे म्हटले आहे. मात्र, त्यासाठी खासगी रुग्णालयातून लस घ्यावी लागेल.



    न्यायाधीश पी. बी सुरेश कुमार म्हणाले की, जर केंद्र आणि राज्य सरकार परदेश प्रवास करणाऱ्यांना कोरोनापासून पासून लवकर आणि चांगली सुरक्षा देण्याची परवानगी देऊ शकते तर इतरांनाही देऊ शकते. समान विशेषाधिकारानुसार हा हक्क आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या धोरणानुसार लोकांकडे लवकर लसीकरण करण्याचा पर्याय आहे. खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून पैसे देऊन लस घेण्याचा अधिकार आहे. यासाठी तात्काळ को-विन पोर्टलवर आवश्यक पर्याय उपलब्ध करुन द्यावा.

    त्यामुळे लोकांना सुरुवातीच्या प्रोटोकॉलनुसार पहिल्या डोसनंतर ४ आठवड्याच्या नंतर कोविशील्डचा दुसरा डोस घेण्याची संधी मिळेल.
    काइटेक्स गारमेंट्स लिमिटेडच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निकाल दिला आहे. ८४ दिवसांची प्रतिक्षा न करता त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोविशील्ड लसीचा दुसरा डोस देण्याची परवानगी मिळावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. आमच्या ५ हजार कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यानंतर कंपनीने ९३ लाख रुपये खर्च करून दुसऱ्या डोसची व्यवस्था केली आहे. परंतु सध्या असलेल्या नियमानुसार कर्मचाºयांनादुसरा डोस देता येऊ शकत नाही, असे म्हटले होते.

    If you are willing to pay at a private hospital, you can take a second dose of the vaccine after four weeks

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    US Report : अमेरिकेचा अहवाल, ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकने भारताला हरवले, पहलगाम हल्ला दहशतवादी हल्ला मानला नाही

    जवळ असलेले मित्र स्वतःच्या करणीने गमवायला मोदी + शाह हे काय “राहुल गांधी” आहेत का??

    Dr. Muzammil Ganai : गिरणीत युरिया दळून स्फोटके बनवायचा डॉ. मुजम्मिल गनई, एनआयएच्या ताब्यातील ड्रायव्हरची कबुली