नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी “गुप्त” असलेली किंवा नसलेली भेट झाल्यानंतर मराठी माध्यमांमध्ये बातम्यांचे पेव फुटले. शरद पवारांना केंद्रात कृषिमंत्री पद आणि नीती आयोगाचे अध्यक्षपद, खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात ऍडजेस्टमेंट, जयंत पाटलांना राज्यात जलसंपदा मंत्रीपद या ऑफर घेऊन अजित पवार हे शरद पवारांना अतुल चोरडियांच्या घरी भेटले, अशा बातम्या मराठी माध्यमांनी छातीठोकपणे दिल्या. पण नेहमीप्रमाणे मराठी माध्यमांचा हा कॉन्फिडन्स “ओव्हर” ठरला!! If BJP boss inflict retirement on its leaders at the age of 75, then will the boss be able to offer anything to 83 year old sharad pawar??
कारण तसे काहीच घडले नसल्याचा खुलासा शरद पवारांनी 24 तासांनी आणि अजित पवारांनी 48 तासांनी केला. हा खुलासा करताना दोन्ही नेते मराठी माध्यमांवर चिडले. पण सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील मात्र मराठी माध्यमांवर चिडले नाहीत. त्यांनी शरद आणि अजित पवार यांच्या “गुप्त” नसलेल्या भेटी संदर्भात शांतपणे उत्तरे दिली. सुप्रिया सुळेंनी तर त्यामध्ये नात्यांचा ओलावा आणला. राजकीय भूमिका वेगळी आणि नात्यांचा ओलावा वेगळा असे त्यांनी माध्यमांबरोबरच काँग्रेस आणि ठाकरे गटालाही सुनावले. पण या झाल्या “पवार सेंट्रिंक” बातम्या!!
त्या पलीकडे जाऊन एक प्रश्न पडतो, तो म्हणजे जर पवारांना कोणी खरीच ऑफर दिली असेल, तर ती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिली असेल. ते भाजपचे केंद्रीय नेतृत्व या ऑफर विषयी गप्प का?? भाजपचे केंद्रीय नेते त्याविषयी बोलत का नाहीत किंवा खुलासा का करत नाहीत??, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे.
पण त्याहीपेक्षा एक कळीचा प्रश्न, जो माध्यमांना मराठी माध्यमांना त्यांच्या “विशिष्ट बुद्धीमुळे” सुचलेलाच नाही, तो म्हणजे भाजपचे सध्याचे बॉस जे आपल्याच पक्षातल्या निष्ठावंत नेत्यांना वयाच्या 75 व्या वर्षी निवृत्त करतात, ते पवारांसारख्या 83 वर्षांच्या ज्येष्ठ नेत्याला अशी कोणती भली मोठी ऑफर देतील का?? आणि तसली कोणतीही ऑफर पवारांना देऊन भाजपला त्यांचा उपयोग किती??, हे प्रश्न कोणत्याही मराठी माध्यमांना सूचलेले नाहीत.
ते प्रश्न त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला विचारले नाहीत. अर्थात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला कोणते प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्यापर्यंत विशिष्ट पोहोच लागते, ती पोहोच मराठी माध्यमांची नाही. त्यामुळे भाजपच्या बॉसना थेट कोणी प्रश्नच विचारू शकत नाही.
अजितदादांबरोबर अख्खी राष्ट्रवादी आली
त्या पलीकडेच आहे एक मुद्दा आहे, तो म्हणजे जर अजित पवारांबरोबर अख्खी राष्ट्रवादी काँग्रेसच भाजपच्या वळचणीला आली असेल, किंबहुना ती पवारांनी पाठवून दिली असेल, तर याचा अर्थ पवार आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व यांच्यात “विशिष्ट डील” झाले असले पाहिजे. ते तसे “डील” झाले असेल, तर भाजपचे बॉस पवारांना भलती ऑफर देण्याच्या फंदात तरी का पडतील??
पवार जर “इंडिया” आघाडीत ठेवून त्यांना “ट्रोजन हॉर्सची” भूमिका दिली असेल, तर त्यांना आपल्या “एनडीए” आघाडीत घेऊन त्यांच्या उपद्रव मूल्याचा त्रास सहन करण्यापेक्षा त्यांना “इंडिया” आघाडीतच ठेवून देणे बरे नाही का!!, असा विचार भाजपचे बॉस करणार नाहीत का??… पण हा प्रश्नही “विशिष्ट बुद्धीच्या” माध्यमांना सूचलेला नाही!!
पवारांची भाजपला गरज तरी आहे का??
पण मूळात हा सर्वात गंभीर मुद्दा आहे, की अजित पवारांसह संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आल्यानंतर, शरद पवारांसारख्या नेत्याची भाजपच्या बॉसना खरंच गरज आहे का??, आणि असलीच तर ती पवार कितपत पूर्ण करू शकतील?? शिवाय आपल्याच पक्षाच्या निष्ठावंत नेत्यांना वयाच्या 75 व्या वर्षी निवृत्त करणारे भाजपचे बॉस पवारांना त्यांच्या वयाच्या 83 व्या वर्षी कुठली गंभीर ऑफर देखील का??, या प्रश्नांच्या खऱ्या उत्तरांमध्ये पवारांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या कथित ऑफरचे खरे उत्तर दडले आहे…!!
If BJP boss inflict retirement on its leaders at the age of 75, then will the boss be able to offer anything to 83 year old sharad pawar??
महत्वाच्या बातम्या
- Independence Day : पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करणार, कोट्यवधी नागरिकांचे लक्ष भाषणाकडे
- हिमाचलमध्ये पावसामुळे प्रचंड विध्वंस, आतापर्यंत ५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू
- स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला केले संबोधित
- योगींच्या यूपीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा पडल्या 1 कोटी रुपयांच्या महागात!!