• Download App
    माणूस गोड असून चालत नाही तर त्याचं काम गोड असलं पाहिजे, यशोमती ठाकूर यांची नवनीत राणा यांच्यावर टीका|If a person is sweet work should be sweet, Yashomati Thakur criticizes Navneet Rana

    माणूस गोड असून चालत नाही तर त्याचं काम गोड असलं पाहिजे, यशोमती ठाकूर यांची नवनीत राणा यांच्यावर टीका

    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : माणूस गोड असून चालत नाही तर त्याचं काम गोड असलं पाहिजे, अशी टीका महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केली आहे. तर कितीही काहीही केलं तरी वय दिसणारच असा टोला राणा यांनी ठाकूर यांना लगावला आहे.If a person is sweet work should be sweet, Yashomati Thakur criticizes Navneet Rana

    छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावरुन अमरावतीमध्ये पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार नवनीत राणा या दोन महिला प्रतिनिधींमध्ये वाद उफाळून आला आहे. ठाकूर यांच्यावर टीका करताना



    खासदार नवनीत राणा यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वयाचा उल्लेख केला होता. कितीही काही केलं तरी तुमच्या चेहऱ्यावरचे खड्डे दिसणारच. माझ्यापेक्षा 10 ते 15 वर्षांनी मोठ्या आहेत. तेवढं वय दिसणारच.

    यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, माझ्या पायाला ज्या भेगा पडल्या आहेत, हातावर घट्टे आणि चेहऱ्यावरील खड्डे हेच शेतकऱ्याच्या मुलीचं खरं सौंदर्य आहे. त्यामुळे माणूस गोड असून चालत नाही तर त्याचं काम गोड असलं पाहिजे.

    If a person is sweet work should be sweet, Yashomati Thakur criticizes Navneet Rana

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे