• Download App
    जर मुलीला वाटत असेल की आपल्या वडिलांनी आपली जबाबदारी घ्यावी तर तिनेदेखील मुलगी असण्याचे कर्तव्य निभावले पाहिजे : सुप्रीम कोर्ट | If a girl feels that her father should take responsibility for her, then she too should fulfill her duty of being a daughter : Supreme Court

    जर मुलीला वाटत असेल की आपल्या वडिलांनी आपली जबाबदारी घ्यावी तर तिनेदेखील मुलगी असण्याचे कर्तव्य निभावले पाहिजे – सुप्रीम कोर्ट

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : नुकताच सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये आदेश दिला आहे की, जर मुलीला वाटत असेल की आपल्या वडिलांनी आपली जबाबदारी घ्यावी तर तिनेदेखील मुलगी असण्याचे कर्तव्य निभावले पाहिजे.

    If a girl feels that her father should take responsibility for her, then she too should fulfill her duty of being a daughter : Supreme Court

    तर काय आहे हा किस्सा?

    एका जोडप्याने लग्न केले. अजय कुमार राठी आणि सीमा राठी त्यांचे नाव. लग्नानंतर दोघांना मुलगी झाली. काही काळाने दोघांमध्ये वाद विवाद सुरू झाले. त्यानंतर बायको आपल्या नवऱ्याला सोडून आपल्या माहेरी राहायला गेली. जाताना तिने आपल्या मुलीला देखील सोबत घेतले. ती मुलगी आता 20 वर्षांची आहे. तर नवरा बायकोंना डिव्होर्स हवा आहे. आणि मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार? यावरून वाद सुरू होता.

    संसार पुन्हा चालू व्हावा यासाठी नवऱ्याने प्रयत्न केले पण बायकोला वेगळे व्हायचे आहे. तिने तशी याचिकादेखील पंजाब आणि हरियाणा कोर्टामध्ये दाखल केली आहे. पण बायकोला पुन्हा त्या व्यक्तीसोबत संसार करायची इच्छा नाहीये पण तिच्या मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च तिच्या नवऱ्याने करावा असे तिचे म्हणणे आहे. यासंबंधी याचिका तिने दाखल केली आहे.


    Supreme Court On NOTA : सुप्रीम कोर्टाने विचारले, NOTAची संख्या जास्त असल्यास निवडणूक रद्द करावी का?


    तर नवऱ्याच्या वकिलांनी कोर्टामध्ये एक विधान केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही मुलगी आपल्या वडिलांना वडीलदेखील मानत नाही. साधा व्हिडिओ कॉल केल्यानंतर त्यांना एक मिनिटासाठी देखील पाहत नाही. तर वडिलांनी तिच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च का उचलावा?

    या प्रश्नाला उत्तर देताना जज संजय किशन कौल आणि एम एम सुरेंद्र यांनी सांगितले की, जर मुलीला वाटत असेल की आपल्या वडिलांनी आपली जबाबदारी घ्यावी तर तिनेदेखील आपली मुलगी असण्याचे सर्व कर्तव्य निभावले पाहिजे. आपल्या वडिलांना वडील म्हणून आदर दिला पाहिजे.

    समुपदेशनाचे बरेच सेशन नवरा बायकोंमध्ये घेण्यात आले होते. पण या दोघांना काही केल्या वेगळे व्हायचे आहे. तर न्यायालयाने आता मुलीचे आणि वडिलांचे नाते चांगले व्हावे यासाठी समुपदेशन देण्याचा निर्णय घेतला आहे.

    If a girl feels that her father should take responsibility for her, then she too should fulfill her duty of being a daughter : Supreme Court

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!