• Download App
    ICSSR to Issue Show-Cause Notice to CSDS Over False Voter Claims महाराष्ट्रातील मतदारांच्या खोट्या दाव्याने CSDS अडचणीत,

    ICSSR : महाराष्ट्रातील मतदारांच्या खोट्या दाव्याने CSDS अडचणीत, आयसीएसएसआर कारणे दाखवा नोटीस बजावणार

    ICSSR

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ICSSR  महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारांच्या संख्येतील तफावतीचा चुकीचा दावा करणे सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’ला (सीएसडीएस) अंगलट आले आहे. याप्रकरणी माफी मागितल्यानंतरही सीएसडीएसला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा विचार भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएसएसआर) केला आहे. डेटातील फेरफारीने सीएसडीएसकडून अनुदान-सहाय्य नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका आयसीएसएसआरने ठेवला आहे.ICSSR

    सीएसडीएसद्वारे कथित डेटा फेरफार करणे आणि भारतीय निवडणूक आयोगाचे पावित्र्य कमी करण्यासाठी केलेला बनाव याची आयसीएसएसआरने गंभीर दखल घेतल्याचे या परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आयसीएसएसआर ही सामाजिक आणि मानवी विज्ञानातील संशोधनासाठी सरकारची सर्वोच्च संस्था असून सीएसडीएसला अनुदान सहाय्य पुरविते. “आयसीएसएसआरच्या निदर्शनास आले आहे की अनुदानित संशोधन संस्था असलेल्या सीएसडीएसच्या जबाबदार व्यक्तीने माध्यमांमध्ये असे वक्तव्य केले आहे जे नंतर महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत डेटा विश्लेषणातील त्रुटींचा हवाला देऊन मागे घ्यावे लागले,” असे आयसीएसएसआरने एका निवेदनात म्हटले आहे. यासोबतच सीएसडीएसला झालेल्या प्रकाराबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्याचाही विचार आयसीएसएसआरकडून केला जात आहे, असे संस्थेतील अधिकारी म्हणाले.ICSSR



    उल्लेखनीय बाब म्हणजे, सीएसडीएसच्या वादग्रस्त िट्वटनंतर भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले. सीएसडीएस “राष्ट्रहिताच्या विरोधात” काम करणाऱ्या राजकीय पक्षांद्वारे देशातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी परकीय निधी मिळवत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

    सीएसडीएस नेमके कशामुळे वादात?

    सीएसडीएस संस्थेचे संस्थेचे निवडणूक विश्लेषक प्रा.संजय कुमार यांनी मंगळवारी केलेल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी २०२४ मध्ये ६ महिन्याच्या अंतराने झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतदरम्यान, महाराष्ट्रातील रामटेक व देवळाली या दोन मतदारसंघातील मतदार संख्या घटल्याबाबतची चुकीची आकडेवारी िट्वट केली होती. वाद झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी ही पोस्ट हटवली आणि दुसऱ्या पोस्टमध्ये “चुकीचा डेटा” पोस्ट केल्याबद्दल माफी मागितली होती. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा डेटाची तुलना करताना चूक झाली. आमच्या डेटा टीमने डेटा चुकीचा वाचला, असे त्यांनी आपल्या नंतरच्या स्पष्टीकरणात नमूद केले होते.

    ICSSR to Issue Show-Cause Notice to CSDS Over False Voter Claims

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Russia रशियाचा ट्रम्पवर पलटवार- भारताला 5% स्वस्त दराने तेल पुरवठा करत राहणार

    Agni-5 बीजिंग, शांघायही भारताच्या टप्यात, अग्नी-५ क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी

    मतदारयादीतील चुकीचा डाटा पोस्ट केल्याप्रकरणी सीएसडीएसचे संजय कुमार अडचणीत, नागपूर, नाशिकमध्ये गुन्हे दाखल