• Download App
    ICC World Cup 2023 Indian squad announced for the World Cup

    ICC World Cup 2023 : विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, शेवटच्या दिवशी केला ‘हा’ बदल

    जाणून घ्या, कोणत्या अष्टपैलू खेळाडूला संघातून वगळले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :  आयसीसी विश्वचषक २०२३ चे बिगुल लवकरच वाजणार आहे. ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पण त्याआधी सर्व 10 संघांना 2-2 सराव सामने खेळायचे आहेत. या स्पर्धेसाठी सर्व १० देशांनी आधीच आपले संघ जाहीर केले आहेत. ICC World Cup 2023 Indian squad announced for the World Cup

    मात्र या संघामधील  बदलासाठी अंतिम तारीख २८ सप्टेंबर ठेवण्यात आली होती. अशा परिस्थितीत भारतीय संघाने या दिवशी आपल्या संघात मोठा बदल करून अंतिम संघ घोषित केला आहे. दुखापतीने त्रस्त असलेला स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याला वगळण्यात आले आहे.

    त्याच्या जागी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश करण्यात आला आहे. अलीकडेच अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही संधी देण्यात आली होती, जिथे त्याने दमदार कामगिरी केली होती. तर मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या वनडेपर्यंतही अक्षर तंदुरुस्त होऊ शकला नाही.

    भारतीय संघाला विश्वचषकापूर्वी २ सराव सामने खेळायचे आहेत. ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळायचा आहे. यासाठी अश्विनसह संपूर्ण टीम गुवाहाटीला पोहोचली आहे.

    ICC World Cup 2023 Indian squad announced for the World Cup

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    BSF Jawan : बांगलादेशी गोतस्करांनी BSF जवानाचे अपहरण केले; जवान बेद प्रकाश सुरक्षित, BGB कडे सोपवले

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- बांगलादेशी घुसखोर काँग्रेसनेच वसवले, त्यांना वाचवत आहेत, म्हणून SIR चा विरोध

    Gaurav Bhatia : भाजपचा आरोप- राहुल गांधी परदेशात भारताला बदनाम करतात, भारतविरोधी शक्तींना भेटतात, राष्ट्रीय हितांविरुद्धच्या कारवायांमध्ये सहभागी