• Download App
    MiG 21 Aircraft Crashes : भारतीय हवाई दलाचे मिग -21 विमान बाडमेरमध्ये कोसळले, पायलट सुरक्षित । iaf mig 21 bison aircraft crashed in barmer during training pilot safe

    MIG 21 Aircraft Crashes : भारतीय हवाई दलाचे मिग -21 विमान बाडमेरमध्ये कोसळले, पायलट सुरक्षित

    MIG 21 Aircraft Crashes : भारतीय हवाई दलाचे मिग -21 विमान राजस्थानच्या बाडमेरमध्ये कोसळले. लष्कराचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सांगितले की, अपघातानंतर वैमानिकाने स्वतःला सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढले. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमान प्रशिक्षण उड्डाणावर होते. MIG 21 Aircraft Crashes in barmer during training pilot safe


    वृत्तसंस्था

    जयपूर : भारतीय हवाई दलाचे मिग -21 विमान राजस्थानच्या बाडमेरमध्ये कोसळले. लष्कराचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सांगितले की, अपघातानंतर वैमानिकाने स्वतःला सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढले. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमान प्रशिक्षण उड्डाणावर होते. बाडमेरचे पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान भुरतिया गावाजवळ पडले. ते म्हणाले की, विमान अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

    हवाई दलाने म्हटले आहे की, “मिग -21 बायसन विमान, जे आज संध्याकाळी 5.30 च्या सुमारास पश्चिम क्षेत्रामध्ये प्रशिक्षणासाठी उड्डाण करत होते, उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड झाल्याने कोसळले. वैमानिक सुखरूप बाहेर पडला. कारणे शोधण्याचे कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

    MIG 21 Aircraft Crashes in barmer during training pilot safe

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Oil companies : तेल कंपन्यांनी 2025-26 मध्ये दररोज ₹116 कोटी नफा कमावला; या काळात कच्च्या तेलाचे दर 71 डॉलर होते

    विजयघोष २०२६ : घोषवादन हा सज्जनशक्तीच्या आत्मविश्वासाचा हुंकार; राष्ट्रसेविका समितीच्या ९० व्या वर्षानिमित्त पश्चिम महाराष्ट्र प्रांतात सोहळा

    E-Prapati : बंद पडलेले PF खाते ट्रॅक करण्यासाठी ‘ई-प्राप्ती’ पोर्टल येणार; UAN नंबरशिवायही पैसे काढता येतील, मासिक पेन्शन ₹7500 पर्यंत वाढू शकते; संसदीय समितीची मंजुरी