• Download App
    आद्य शंकराचार्य यांच्या समधीस्थळाचा जीर्णोद्धार, भव्य पुतळ्यामुळे मी पंतप्रधान मोदी यांचा आभारी; माजी पंतप्रधान देवेगौडांकडून आनंद व्यक्त ।I thank Prime Minister Modi for restoring the samadhi of Adya Shankaracharya, for the magnificent statue; Former Prime Minister Deve Gowda expressed happiness

    आद्य शंकराचार्य यांच्या समधीस्थळाचा जीर्णोद्धार, भव्य पुतळ्यामुळे मी पंतप्रधान मोदी यांचा आभारी; माजी पंतप्रधान देवेगौडांकडून आनंद व्यक्त

    वृत्तसंस्था

    बंगळुरू : केदारनाथ येथील आद्य शंकराचार्य यांच्या समधीस्थळाचा केलेला जीर्णोद्धार आणि शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या उदघाटनाचे स्वागत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी केले असून आनंदही व्यक्त केला आहे. I thank Prime Minister Modi for restoring the samadhi of Adya Shankaracharya, for the magnificent statue; Former Prime Minister Deve Gowda expressed happiness

    देवेगौडा म्हणाले, मी या घटनेमुळे अतिशय उल्हासित झालो आहे. विशेष म्हणजे कर्नाटकातील म्हैसूर येथील शिल्पकार अरुण योगीराज यांनी आदी शंकराचार्य यांचा १२ फूट उंचीचा पुतळा घडविला असून पुतळ्यासाठी लागणारा दगडही कर्नाटकातील म्हैसूरमधून पाठविण्यात आला, याचा मला मोठा अभिमान आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांच्यामुळे शंकराचार्य यांच्या समधीस्थळाचा कायापालट झाला. त्या बद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.



    ते म्हणाले,आद्य शंकराचार्य यांनी देशात ४ धर्मपीठे स्थापन करून हिंदू धर्माला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले. कर्नाटकातील चिक्कमंगळूर जिल्ह्यात शुंगेरी येथे त्यापैकी एक धर्मपीठ त्यांनी स्थापन केले होते. त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार आणि पुतळा उभरल्यामुळे शृंगेरी येथील धर्मपीठाच्या आठवणी जागृत झाल्या. आता मी पण लवकरच केदारनाथ येथील या नव्या स्मारकाला भेट देणार आहे. तसेच शंकराचार्य यांच्या समधीस्थळासमोर नतमस्तक होणार असून त्यांचे आशीर्वाद घेणार आहे.या पवित्र स्थळाचा जीर्णोद्धार केल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी यांचे शतशः आभार मानतो.

    शृंगेरी धर्मपिठाची महती सांगताना ते म्हणाले, वाडीयार, पेशवे, हैदर अली, टिपू सुलतान, हैद्राबादच्या निजामाची शृंगेरीवर आस्था होती. त्यांनी वेळोवेळी देणग्या आणि दानधर्म मठाला केला होता. हिमालयात आदी शंकराचार्य यांच्या समाधीचा जीर्णोद्धार आणि त्यांचा उभारलेला भव्य पुतळ्यामुळे ते एक भविष्यातील महत्वाचे हिंदूंचे तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

    I thank Prime Minister Modi for restoring the samadhi of Adya Shankaracharya, for the magnificent statue; Former Prime Minister Deve Gowda expressed happiness

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    2006 च्या साखळी बॉम्बस्फोटातले 12 आरोपी निर्दोष सुटलेच कसे?, अंतर्मुख होऊन विचार करण्याचा उज्ज्वल निकमांचा परखड सल्ला!!

    UIDAI : शाळांमध्ये मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्याची योजना; UIDAI 7 कोटी मुलांचे बायोमेट्रिक्स अपडेट करणार

    Chhangur Baba : छांगूर बाबाचा निकटवर्तीय करोडपती बाबूला एटीएसकडून अटक; राजेश उपाध्याय बलरामपूर कोर्टात तैनात