वृत्तसंस्था
नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये पूर्ण बहुमत असलेल्या काँग्रेस पक्षात उभी फूट पडण्याचे निश्चित झाले असून पक्षामधला सत्तासंघर्ष पक्षश्रेष्ठींच्या एका भेटीनंतर शमन होण्याऐवजी अधिकच वाढल्याचे स्पष्ट होत आहे. I received a message from KC Venugopal that I have to meet Rahul Ji in Delhi today, so I am going there to meet party high command: Chhattisgarh CM Bhupesh Baghel
छत्तीसगड सरकारमधील मंत्री टी. एस. सिंगदेव यांच्या बंडखोरी नंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा आमदारांचा गटही ॲक्टिव्ह झाला असून ते आज आपल्या 26 आमदारांसह काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासमवेत सहा मंत्री देखील असणार आहेत टी एस पासिंग देव यांनी काल पुन्हा एकदा आपल्या बंडखोरीचा पुनरुच्चार केला.
भूपेश बघेल यांना आपण पन्नास वर्षे मुख्यमंत्री राहू किंवा दहा वर्षे मुख्यमंत्री राव असे वाटत असेल. परंतु निर्णय मात्र हायकमांडच्या हातात आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. पक्षामध्ये नेतृत्वासाठी निकोप स्पर्धा असावी. प्रत्येकाला आपण नेतृत्व करावे असे वाटणे गैर नाही. पक्षश्रेष्ठी जो देतील तो निर्णय मान्य करावा, असे ते म्हणाले होते.
सिंगदेव यांची भूमिका पक्षश्रेष्ठींच्या पहिल्या भेटीनंतर देखील बदलली नाही. त्यामुळे भूपेश बघेल यांचा गट सक्रिय झाला आणि ते आज 26 आमदारांसह राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. या 26 आमदारांना दिल्लीला आणण्यासाठी खास चार्टर्ड प्लेन रायपूरला मागविण्यात आले. त्यांना एकत्र दिल्लीत आणण्यात आले.
भूपेश बघेल यांच्या या राजकीय खेळ इकडे स्वतःच्या गटाचे शक्तिप्रदर्शन म्हणून बघितले जात आहे. काँग्रेसला छत्तीसगडमध्ये संपूर्ण बहुमत आहे. परंतु पक्षातच नेतृत्व स्पर्धा इतकी तीव्र आहे की पक्षातच फूट पडते की काय अशी चिन्हे सिंगदेव यांच्या बंडखोरी तून दिसू लागली आहेत.
I received a message from KC Venugopal that I have to meet Rahul Ji in Delhi today, so I am going there to meet party high command: Chhattisgarh CM Bhupesh Baghel
महत्त्वाच्या बातम्या
- युनिटेकच्या मालकांना तिहारमधून मुंबईतील तुरुंगात हलवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
- छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांच्या खुर्चीला लागणार सुरुंग, काँग्रेसच्या सर्व आमदारांना दिल्लीत बोलावले
- योदी आदित्यनाथ सरकारने जाहीर केल्या शेतकऱ्यांसाठी अनेक सवलती, विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु
- जालियनवाला बागचा नवीन परिसर २८ ऑगस्ट रोजी राष्ट्राला समर्पित केला जाईल, पंतप्रधान मोदी उद्घाटन करतील