• Download App
    मोदी राजवटीत अविष्कार स्वातंत्र्याच्या नावाने "ढोलबडवी पुकार"; पण आता I.N.D.I.A आघाडीचा 14 अँकर्सवर बहिष्कार!! I.N.D.I.A Alliance boycotts 14 anchors

    मोदी राजवटीत अविष्कार स्वातंत्र्याच्या नावाने “ढोलबडवी पुकार”; पण आता I.N.D.I.A आघाडीचा 14 अँकर्सवर बहिष्कार!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशावरच्या मोदी राजवटीत अविष्कार स्वातंत्र्याचा गळा घोटला गेला म्हणून पुरस्कार वापसी सारखी नाटके करणाऱ्या लिबरल समर्थक I.N.D.I.A आघाडीने अविष्कार स्वातंत्र्याचा “ढोल बडवी पुकारा” केला, पण आता मात्र देशातल्या 14 अँकर्स वर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.

    I.N.D.I.A Alliance boycotts 14 anchors

    इतकेच नाही या अँकर्सवर बहिष्कार घालून ते बधले नाहीत, अथवा त्यांचे न्यूज चॅनेल्स “सुधारले” नाहीत, तर ज्या 11 राज्यांमध्ये I.N.D.I.A आघाडीच्या घटक पक्षांची सरकारे आहेत, त्या राज्यांमधल्या सरकारी जाहिराती संबंधित अँकर्स आणि न्यूज चॅनेल्सना बंद करून टाकण्याचा कठोर उपाय देखील करण्यात येईल, अशी धमकी I.N.D.I.A आघाडीतल्या सूत्रांनी दिली आहे. देशातल्या अविष्कार स्वातंत्र्याचे हे नवे “ढोलबडवी रूप” I.N.D.I.A आघाडीने समोर आणले आहे.



     

    आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

    I.N.D.I.A आघाडीच्या समन्वय समितीची बैठक काँग्रेसचे संघटन सचिव केसी विनोगोपाल यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांचे निवासस्थान 6, जनपथ येथे झाली. त्या बैठकीत I.N.D.I.A आघाडीतल्या घटक पक्षांच्या प्रवक्त्यांनी देशातल्या 14 अँकर्सच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. यामध्ये नाविका कुमार, अर्णव गोस्वामी, अमन चोप्रा, सुधीर चौधरी, शिव अरूर, सुशांत सिन्हा, चित्रा त्रिपाठी, अमिष देवगण, आदिती त्यागी, गौरव सावंत, प्राची पराशर, आनंद नरसिंहन, अशोक श्रीवास्तव, रुबिका लियाकत या 14 अँकर स्वर आणि त्यांच्या न्यूज चैनल वर बहिष्कार घालण्याचा समावेश आहे.

    न्यूज लॉन्ड्री सारख्या I.N.D.I.A आघाडी समर्थक वेबपोर्टलने देखील ही बातमी चालविली. त्यामुळे या बातमीत I.N.D.I.A आघाडीच्या दृष्टीनेही तथ्य असल्याचे स्पष्ट होते.

    2014 मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर देशात अविष्कार स्वातंत्र्याचा, माध्यम स्वातंत्र्याचा गळा घोटला गेल्याचा गळा सर्व विरोधी पक्ष आणि लिबरल जमातीचे समर्थक काढत होते. त्यासाठी त्यांनी पुरस्कार वापसी सारखी नाटके देखील केली. पण आता आपल्या सेट नॅरेटिव्हला धक्का लावणारे आणि अडचणीचे प्रश्न विचारणारे अँकर्स नकोसे झाले म्हणून I.N.D.I.A आघाडीतल्या प्रवक्त्यांनी 14 अँकर्स वर बहिष्कार घातला आणि त्या पलीकडे जाऊन त्यांच्या न्यूज चॅनलच्या सरकारी जाहिराती बंद करण्याची धमकी दिली.

    1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी प्रसार माध्यमांवर सेन्सॉर लावले. त्यांच्या नातवाच्या काळात हे सेन्सॉर लावणे शक्य नसल्याने न्यूज अँकर्स आणि चॅनेल्सवरच बहिष्कार घालण्याचा निर्णय I.N.D.I.A आघाडीने घेतला, अशी टीका भाजपने केली आहे.

    I.N.D.I.A Alliance boycotts 14 anchors

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य