विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: माझी हत्या होवू शकते, माझ्या जिवाला धोका आहे मला सुरक्षा द्या, असे पत्र एमएमआयचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले आहे. I may be murdered, give security cover ; Asaduddin Owaisi’s letter to Lok Sabha Speaker
या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात खा. ओवेसी यांनी म्हटले आहे की, दिल्लीतील शासकीय निवासस्थानाची तोडफोड झाली, त्यामुळे माझ्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
मंगळवारी ओवेसी यांच्या नवी दिल्लीतील 24 अशोक रोड येथील शासकीय निवासस्थानी हल्ला झाला होता, त्यावेळी हल्लेखोरांकडे काठी, कुऱ्हाड व धारदार शस्त्रे होती. यावेळी दगडफेकही करण्यात आली, यामध्ये लाईट आणि खिडकीच्या काचाही तोडण्यात आल्या.
तसेच घराला लावलेल्या नेमप्लेटही तोडली. त्यामुळे आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी व या हल्ल्याची चौकशी खासदारांच्या विशेषाधिकार समितीकडे सोपवावी.
I may be murdered, give security cover ; Asaduddin Owaisi’s letter to Lok Sabha Speaker
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेसमध्ये संतापाला जागा नाही, पण अपमानाला आहे’, काँग्रेसच्या प्रतिक्रियेवर माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा पलटवार
- Dombivli Gang Rape : आणखी दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात, सामूहिक बलात्कारप्रकरणी आतापर्यंत 28 नराधमांना अटक
- पवारांनी केली की “पॉवरफुल खेळी” आणि काँग्रेस नेत्यांच्या फडणवीसांशी भेटी “लोटांगण”…??
- ‘ देवगिरी किल्ला’, ‘अजिंठा- वेरूळ’ येथील लेणी पाहून सुप्रिया सुळे हरखल्या; ‘चिरोट्या’ची चवही रेंगाळली जिभेवर