पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारतप्रेमाचा पुळका आला आहे. कोणत्याही पाकिस्तानीपेक्षा मी भारताला जास्त ओळखतो. मला भारतात प्रेम आणि आदर मिळाला. योच कारण दोन्ही देश क्रिकेटप्रेमी असल्याचे ते म्हणाले.”I know India better than any Pakistani, I got love and respect here,” said Imran Khan.
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारतप्रेमाचा पुळका आला आहे. कोणत्याही पाकिस्तानीपेक्षा मी भारताला जास्त ओळखतो. मला भारतात प्रेम आणि आदर मिळाला. योच कारण दोन्ही देश क्रिकेटप्रेमी असल्याचे ते म्हणाले.
न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत माजी क्रिकेटपटू असलेले इम्रान खान म्हणाले, क्रिकेट हा भारतातील अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. भारत आणि पाकिस्तानचा जणू क्रिकेट हा धर्मच आहे. त्यामुळे मला भारतातून खूप प्रेम आणि आदर मिळाला.
ते म्हणाले, भारत आणि पाकिस्तान या देशांतील व्यापारी संबंध सुरळित झाले नाहीत याची खंत आहे. दोन देशांमध्ये चांगले व्यापारी संबंध निर्माण व्हायला हवेत. दोन्ही देशांना त्याचा फायदा मिळाला असतो.
इम्रान खान म्हणाले मी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर पहिली गोष्ट केली ती म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला.
त्यांना सांगितले की पाकिस्तानातील गरीबी संपविण्यासाठीच मी पंतप्रधान झाले आहे. त्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरळित व्यापरी संबंध निर्माण होणे. त्याचा दोन्ही देशांना फायदा होईल. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्टीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेतून आले आहेत.
त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात या विचारधारेची मोठक्ष भिंत आहे. त्यामुळे भारतामध्ये नरेंद्र मोदी यांना पर्याय असता तर आमचे संबंध आणखी चांगले होऊ शकले असते. आम्ही संवादाने आमच्यातील सर्व मतभेद मिटविले असते.
“I know India better than any Pakistani, I got love and respect here,” said Imran Khan.
महत्त्वाच्या बातम्या
- राफेल विमानांचा वेगवान विक्रम, १२ तासांत कापले १७ हजार किलोमीटरचे अंतर
- पुणेकरांना उपदेशाचे डोस स्वत : च्या मतदारसंघात गर्दी अलोट, गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेशही अडचणीत, पैसे फिरविण्याचे केले काम
- महाराष्ट्रातील ५ झेडपी निवडणूकांविरोधात सुप्रिम कोर्टात जाण्याची ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची घोषणा