विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटक काँग्रेसमध्ये राजकीय अस्वस्थता आहे. राज्यात काँग्रेसचे सत्ता असताना सुद्धा मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातली दरी रुंदावत चालली आहे. यांच्या राजकीय खुणा दिसून आल्या. डी. के. शिवकुमार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घ्यायला सुरुवात केली आहे. शिवकुमार यांनी स्वतःच तसे वक्तव्य केले.
मी जन्मजात काँग्रेसी आहे. पण सध्या संघाला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, असे शिवकुमार म्हणाले. मी राजकीय पक्षांचे संशोधन केले. संघ कर्नाटकात संस्था निर्माण करण्यात आघाडीवर आहे. ते प्रत्येक जिल्ह्यात शाळा बांधत आहेत. ते चांगले विद्यार्थी घडवत आहेत. त्यांच्यावर चांगले संस्कार करत आहेत. आमच्यात राजकीय मतभेद खूप आहेत. पण मी संघाचा इतिहास समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, असे शिवकुमार यांनी सांगितले.
शिवकुमार यांनी कर्नाटकात काँग्रेसचे सत्ता आणण्यासाठी खूप कष्ट घेतले. प्रदेशाध्यक्ष पदावरून काम करताना संपूर्ण राज्य पिंजून काढले भाजपच्या प्रभाग क्षेत्रात देखील शिवकुमार यांनी चांगले काम करून दाखविले. पण काँग्रेसच्या नेत्यांनी शिवकुमार यांच्या कष्टाचे चीज केले नाही. त्यामुळे शिवकुमार यांनी वेगळा राजकीय सूर लावल्याचे मानले जात आहे.
राहुल गांधी आणि बाकीचे काँग्रेस नेते संघाच्या द्वेषात आकंठ बुडालेले असताना शिवकुमार यांनी संघ समजून घेण्याचे सूचक वक्तव्य केल्याने कर्नाटकात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचे मानले जात आहे. कारण गेल्या कित्येक वर्षांपासून शिवकुमार मुख्यमंत्री व्हायचा प्रयत्न करत आहेत, पण काँग्रेसचे नेते त्यांना मुख्यमंत्री करत नाहीत. त्याऐवजी काँग्रेसच्या नेत्यांनी सिद्धरामय्या यांच्या पारड्यातच आपले वजन टाकले. त्यामुळे शिवकुमार यांनी आता आरपार ही लढाई समजून संघाशी जवळ एक साधणारे वक्तव्य केल्याचे मानण्यात येत आहे.
I am a Congressman by birth, but I am trying to explain the history of the Sangh; Shivkumar’s suggestive statement
महत्वाच्या बातम्या
- आगमना आधीच गणरायाची कृपादृष्टी; सरकारी नोकरदारांचा 26 ऑगस्टलाच पगार; आर्थिक तंगी टाळण्यासाठी फडणवीस सरकारचा निर्णय
- Sanjay Kumar : सीएसडीएस संचालक संजय कुमार यांच्याविरुद्ध FIR; 2 जागांवर कमी मतदारांचा दावा केला होता
- Trump : ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाजवळ 3 युद्धनौका पाठवल्या; ड्रग माफियांचा बंदोबस्त करण्याचा उद्देश
- Malaysia : मलेशियात नमाज पठण विसरल्यास 2 वर्षे शिक्षा; तेरेंगानू राज्यातील शरिया कायद्यात बदल, 60 हजार रुपये दंड