• Download App
    पती दहशतवादी आणि पत्नी मानवाधिकार मंत्री; यासिन मलिकची पत्नी मुशाल पाकिस्तान सरकारच्या कॅबिनेटमध्येHusband Terrorist and Wife Human Rights Minister; Yasin Malik's wife Mushal in Pakistan government cabinet

    पती दहशतवादी आणि पत्नी मानवाधिकार मंत्री; यासिन मलिकची पत्नी मुशाल पाकिस्तान सरकारच्या कॅबिनेटमध्ये

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : दहशतवाद्याची पत्नी मानवाधिकार मंत्री झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? साहजिकच नाही, पण आता आपल्या शेजारी देश पाकिस्तानमध्ये असे होणार आहे. भारतातील दोषी दहशतवादी यासिन मलिकची पत्नी मुशाल हुसैन मलिक पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारमध्ये मंत्री होण्याची शक्यता आहे. मुशाल यांचा पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांच्या सरकारमध्ये काळजीवाहू मंत्री म्हणून समावेश केला जाईल, असा दावा केला जात आहे.Husband Terrorist and Wife Human Rights Minister; Yasin Malik’s wife Mushal in Pakistan government cabinet

    वृत्तानुसार, मुशाल हुसैन मलिक या पाकिस्तानच्या काळजीवाहू मंत्रिमंडळात पंतप्रधानांचे मानवाधिकारांवर विशेष सहाय्यक असतील. यासिन मलिकच्या शिक्षेबाबत मुशाल सुरुवातीपासूनच भारताविरुद्ध विष ओकत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर त्या भारताविरोधात अधिक आक्रमक भूमिकेत आल्या नाही तरच नवल!



    कोण आहे मुशाल हुसैन मलिक

    मुशाल हुसैन मलिक या पाकिस्तानमधील चित्रकार आहेत. त्या सुरुवातीपासूनच काश्मीरबाबत पाकिस्तानात गरळ ओकत आल्या आहेत. यादरम्यान त्यांची भेट दहशतवादी यासीन मलिकशी झाली. त्यानंतर दोघांनी 22 फेब्रुवारी 2009 रोजी इस्लामाबादमध्ये लग्न केले. मुशालचा जन्म 1986 मध्ये कराची, पाकिस्तानमध्ये झाला. मुशालने हायस्कूलचे शिक्षण इस्लामाबादमधील पाकिस्तानमधील सर्वात प्रसिद्ध शाळा बीकनहाऊसमधून केले. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे. मुशाल मलिकचे वडील हुसेन मलिक हे पाकिस्तानी अर्थतज्ज्ञ आणि स्तंभलेखक होते. ते कायदे-ए-आझम मोहम्मद अली जिना विद्यापीठ, इस्लामाबाद येथे प्राध्यापक राहिले आहेत.

    मुशाल स्वतःला म्हणवतात मानवाधिकार कार्यकर्ता

    दहशतवादी यासिन मलिकची पत्नी मुशाल हुसैन मलिक या पीस अँड कल्चर ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा आहेत. ही संघटना जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी जगभरात मोहीम राबवते. याशिवाय संस्कृती आणि वारसा जपण्याचेही या संस्थेचे कार्य आहे. मुशाल स्वतःला मानवाधिकार कार्यकर्त्या म्हणून सांगतात, तर तिचा पती दोषी दहशतवादी आहे. मुशालने 2015 पासून कधीही भारताला भेट दिली नाही. आपल्या पतीचा आधार मिळवण्यासाठी ती पाकिस्तानात काम करते. याआधीही तिने भारतावर पतीच्या न्यायालयीन हत्येचा खोटा आरोप केला होता.

    Husband Terrorist and Wife Human Rights Minister; Yasin Malik’s wife Mushal in Pakistan government cabinet

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!