वृत्तसंस्था
बार्सिलोना : क्रिकेट सामन्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्या पेक्षा जास्त प्रतिसाद महिला फुटबॉल सामन्याला मिळाला आहे. स्टेडियम खचाखच भरले होते. विशेष म्हणजे हा एक विक्रम झाला आहे. Huge response to women’s football match, The stadium is packed; More than 91,000 spectators
बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद दरम्यान महिला चॅम्पियन्स लीग फुटबॉल सामना झाला .कॅम्प नोऊ स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. तब्बल ९१ हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. हा एक विक्रम होता. बार्सिलोनाने हा सामना ५-२ असा जिंकला. त्यामुळे प्रेक्षकांच्या आनंदात आणखी भर पडली. या सामन्यासाठी ९१,५५३ प्रेक्षकांची नोंद झाली आहे. यापूर्वी अमेरिका आणि चीन यांच्यात १९९९च्या महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यास प्रेक्षकसंख्येचा विक्रम नोंदला गेला होता. त्या सामन्यासाठी रोज बाऊल स्टेडियमवर ९०,१८५ प्रेक्षक उपस्थित होते.
Huge response to women’s football match, The stadium is packed; More than 91,000 spectators
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यात आगीच्या दोन किरकोळ दुर्घटना
- आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : एनसीबीला मोठा दिलासा, कोर्टाने आरोपपत्र दाखल करण्याची मुदत 60 दिवसांनी वाढवली
- कामाची माहिती : आजपासून झाले हे 8 मोठे बदल, गृहकर्जाच्या व्याजावरील सबसिडी संपुष्टात, महामार्गावर भरावा लागणार जास्तीचा टॅक्स
- लंकेला लागली महागाईची आग : श्रीलंकन रुपयाचे अवघ्या महिनाभरात 46 टक्के अवमूल्यन, कसे ठरतात डॉलरच्या तुलनेत दर? वाचा सविस्तर…