• Download App
    निवडणुकीत नावे कशी गहाळ झाली? कुणाच्या आदेशाने झाली? भाजप शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी|How names were missing in the election? By whose order? BJP delegation demands an inquiry to the Election Commission

    निवडणुकीत नावे कशी गहाळ झाली? कुणाच्या आदेशाने झाली? भाजप शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सन 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्या मतदारांची नावे यादीत होती. ती 2024 च्या निवडणुकीत गहाळ कशी झाली? का झाली? कुणाच्या आदेशाने झाली? या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करीत आज भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांची दिल्लीत भेट घेतली.How names were missing in the election? By whose order? BJP delegation demands an inquiry to the Election Commission

    मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार, खासदार धोत्रे, हेमंत वणगा आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा समावेश होता. सुमारे एकतास ही बैठक झाली.



    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जे मतदान नोंदणी अभिमान सध्या सुरु आहे त्यातील त्रुटी आणि काही महत्त्वाचे मुद्दे या शिष्टमंडळाने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. अभियानामध्ये नव्याने नोंदणी करताना मतदाराचे फोटो, पत्ता तसेच नाव यामध्ये येणाऱ्या काही तांत्रिक अडचणी सुध्दा शिष्टमंडळाने लक्षात आणून दिल्या. या अभियानाचा लेखाजोखा मांडण्यात आला.

    या भेटीबद्दल माहिती देताना आमदार आशिष शेलार यांनी सांगितले की, मुंबईतील जवळजवळ 1100 गृहनिर्माण सोसायटीमध्ये बुथ निर्मितीच्या कामाने गती घेतली आहे. तसेच 25 जुलै पर्यंत मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्याचा कालावधी वाढवून देण्यात यावा अशी विनंती आम्ही केली त्यानुसार आयोगाने 7 दिवस मतदार नोंदणी अभियानात वाढ करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अंतिम यादी जाहीर करण्याची मुदतही सात दिवस पुढे ढकलण्यात आली असून आता 2 आँगस्ट पर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. त्याचा मतदारांना फायदा होईल, असेही आमदार आशिष शेलार यांनी सांगितले.

    दरम्यान, यावेळी शिष्टमंडळाने प्रमुख मागणी करताना आयोगाचे एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधण्यात आले. सन 2019 च्या लोकसभा निवडणूकीत ज्यांनी मतदान केले होते, अशा मतदारांची नावे 2024 च्या निवडणुकीत गहाळ झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे मतदारांना मतदान करता आले नाही. महाराष्ट्रात अशा मतदारांची संख्या मोठी होती. ही नावे का गायब झाली? कशी गायब झाली? कुणाच्या आदेशाने गायब झाली?

    या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करीत या सर्व मतदारांना पुन्हा यादीत सामावून घेण्यासाठी काय करता येईल याबाबत आयोगाने लक्ष द्यावे अशी विनंती या शिष्टमंडळाने केली. त्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद आयोगाने दिल्याची माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे. तसेच मतदारांनी आपले नाव यादीमध्ये बिनचूक कसे नोंदले जाईल, ओळखपत्र, फोटो बिनचूक कसे येतील याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार आशिष शेलार यांनी केले आहे.

    How names were missing in the election? By whose order? BJP delegation demands an inquiry to the Election Commission

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य