प्रतिनिधी
बंगळुरू : कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी (11 मार्च) 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तत्पूर्वी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली ज्यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा, धर्मेंद्र प्रधान आणि मनसुख मांडविया यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.How many SC-ST and OBC among BJP’s 189 candidates? Know, Tickets for Ex-IAS-IPS too
बैठकीनंतर धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, कर्नाटक निवडणूक 2023 साठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
चला तर मग जाणून घेऊया या यादीत कोणत्या समाजाचे किती उमेदवार आणि किती IAS आणि IPS यांना तिकीट मिळाले आहे. भाजपने जारी केलेल्या 189 उमेदवारांच्या या यादीत 52 उमेदवार नवीन आहेत. कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपच्या 189 उमेदवारांच्या यादीत 32 ओबीसी, 30 एससी, 16 एसटी उमेदवार असल्याचे पक्षाचे नेते अरुण सिंह यांनी म्हटले आहे.
डॉक्टर, आयएएस आणि आयपीएस यांनाही तिकिटे
भाजपच्या या यादीत 9 डॉक्टर, 31 पदव्युत्तर, 5 वकील, 3 शिक्षक, 1 IAS निवृत्त अनिल कुमार, 1 IPS भास्कर राव, 3 निवृत्त अधिकारी आणि 8 महिलांना तिकीटे देण्यात आली आहेत. तर सिगावमधून बसवराज बोम्मई, कागवाडमधून बाळासाहेब पाटील, मुदुलमधून गोविंद करजोळ आणि बिलगीमधून मुर्गेश निरानी निवडणूक लढवणार आहेत. धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “34 नावांची यादी अद्याप प्रलंबित आहे. येत्या एक-दोन दिवसांत तीसुद्धा जाहीर होईल. जगदीश शेट्टार हे आमचे मोठे नेते आहेत, आम्ही त्यांची समजूत घालू. आम्ही त्यांच्याशी बोललो आहोत. ते आमच्यासोबत असतील याची आम्हाला खात्री आहे.”
जगदीश शेट्टर यांनी मागितले तिकीट
त्याच वेळी, भाजप नेतृत्वाने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते जगदीश शेट्टर यांना निवडणूक न लढवण्यास सांगितले आहे, परंतु त्यांनी हा निर्णय अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. सर्वेक्षणात माझी लोकप्रियता चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. मी एकही निवडणूक हरलेली नाही, त्यामुळे मला लढण्याची संधी द्यावी, अशी विनंती मी पक्षप्रमुखांकडे केली असल्याचे ते म्हणाले.
How many SC-ST and OBC among BJP’s 189 candidates? Know, Tickets for Ex-IAS-IPS too
महत्वाच्या बातम्या
- अभिमानास्पद : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
- पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पसरले हास्य; आतापर्यंत १.३ लाख कोटी रुपयांचे अदा करण्यात आले दावे
- ठाकरे – पवार सिल्वर ओकवर भेट; महाविकास आघाडीतील मतभेदांवर चर्चा की काही पॉलिटिकल सरप्राईज एलिमेंट??
- Karnataka election : भाजपाने १८९ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत ५२ नवीन नावं