विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकेकाळी स्वबळावर निवडणुका लढणारा काँग्रेस पक्ष आता कुबड्यांच्या आधारावर उभा आहे. या कुबड्या केव्हापर्यंत घेणार आहोत. आता पुन्हा एकदा काँग्रेसला आपल्या पायावर उभे राहावे लागणार आहे, असा घरचा अहेर पक्षाचे वरिष्ठ नेते तारिक अन्वर यांनी दिला आहे.How long will the crutches last? Congress should stand on its own feet, said Tariq Anwar
बिहारमध्ये विधानसभेच्या दोन्ही जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. राजदसोबतची आघाडी पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे. बिहारमध्ये काँग्रेस पक्ष अतिशय कमजोर झाला आहे. या पोटनिवडणुकीचे निकाल हेच सांगत आहेत की, आता स्वत:ला मजबूत करण्याची वेळ आलेली आहे. आपण जोपर्यंत संघटना मजबूत करणार नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षासोबतची आघाडी यशस्वी ठरणार नाही.
राजदने आघाडी तोडण्याबाबत भक्त चरण दास यांनी केलेले वक्तव्य सत्य आहे. त्यांनी दोन्ही जागांवर उमेदवार दिले. भविष्यात आघाडी झाली, तरी ती सन्मानजनक व्हावी, यासाठी काँग्रेसला स्वत:च्या पायावर उभे राहावेच लागेल. पक्ष संघटन बळकट करावेच लागणार आहे, असे तारिक अन्वर यांनी सांगितले.
बिहारमध्ये विधानसभेच्या दोन जागांवर पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या मुद्यावर काँग्रेस आणि राजदने आघाडी तोडण्याची घोषणा केली. त्यानंतर दोन्ही पक्षांनी दोन्ही मतदारसंघांत उमेदवार उतरवले. मात्र, काँग्रेस आणि राजदच्या उमेदवारांचा पराभव झाला. काँग्रेस या दोन मतदारसंघांत अनामत रक्कमही वाचवू शकली नाही.
How long will the crutches last? Congress should stand on its own feet, said Tariq Anwar
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान