दुबई एक्स्पो गेल्या वर्षी दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार होता, परंतु कोविड या जागतिक महामारीमुळे हा एक्स्पो गेल्या वर्षी आयोजित ना करता यावर्षी आयोजित करण्यात आला आहे. Hosting the World Expo in Dubai; The cultural splendor of Maharashtra will be presented in different forms
विशेष प्रतिनिधी
दुबई : दुबई येथे 18 ते 23 नोव्हेंबर दरम्यान वर्ल्ड एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे.दुबई एक्स्पो गेल्या वर्षी दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार होता, परंतु कोविड या जागतिक महामारीमुळे हा एक्स्पो गेल्या वर्षी आयोजित ना करता यावर्षी आयोजित करण्यात आला आहे.या एक्सपोमध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वेगवेगळ्या स्वरूपात सादर करण्यात येणार आहे.
यादरम्यान सहा चित्रपट, एक मराठी वेबसिरीज आणि महाराष्ट्राची चित्रधारा दुबई एक्सपोमध्ये दाखविण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
अमित देशमुख म्हणाले की, महाराष्ट्राचे सांसकृतिक वैभवाची झलक या एक्स्पोमध्ये दाखविण्यात येईल.यामध्ये कडू गोड, तक तक, ताजमहल, बारडो, गोष्ट एका पैठणीची, गोदाकाठ असे ६ चित्रपट, वेब सिरीज आणि महाराष्ट्राची चित्रधारा यावेळी दाखविण्यात येणार आहे. यामध्ये २० लोककलाकार सहभागी होणार आहेत.
या एक्स्पोसाठी महाराष्ट्रातून सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे सहभागी झाले आहेत.
दरम्यान अमित देशमुख यावेळी आयोजित करण्यात येणाऱ्या गोलमेज चर्चासत्रात या एक्सपोदरम्यान महाराष्ट्रामध्ये चित्रीकरणासाठी एक खिडकी योजनेद्वारे काय सुविधा देण्यात येतात तसेच महाराष्ट्रात चित्रीकरण कसे चालते.दरम्यान येणाऱ्या काळात नेमक्या काय सुविधा असणार आहेत याची संपूर्ण माहिती देणार आहेत.
Hosting the World Expo in Dubai; The cultural splendor of Maharashtra will be presented in different forms
महत्त्वाच्या बातम्या
- वेळेच्या चौकटीशिवाय भरतीप्रक्रिया व्यर्थ, सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
- ‘मन ही मन तुझे चाहा…’ अमृता फडणवीस यांचं नवं गाण झालं लॉन्च ; चाहत्यांनी दिला मोठा प्रतिसाद
- शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केला १०० कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप
- पाकिस्तानातून चीनला जाणारे रेडिओॲक्टिव्ह पदार्थ मुंद्रा पोर्टवर जप्त, कस्टम आणि महसूल गुप्तचर विभागाची कारवाई