• Download App
    कोविड होम टेस्टिंग कीट येत्या ४ – ५ दिवसांत बाजारात उपलब्ध होणार; ICMR ची महत्त्वपूर्ण माहिती, चाचणीची पद्धतही सोपी |home testing kit will be available in the market in next 4-5 days; Important information of ICMR, simple method of testing

    कोविड होम टेस्टिंग कीट येत्या ४ – ५ दिवसांत बाजारात उपलब्ध होणार; ICMR ची महत्त्वपूर्ण माहिती, चाचणीची पद्धतही सोपी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोविडची चाचणी घरच्या घरी सोप्या पद्धतीने करता यावी यासाठी कोविड होम टेस्टिंग कीट येत्या ४ – ५ दिवसांमध्ये बाजारात उपलब्ध होईल, home testing kit will be available in the market in next 4-5 days; Important information of ICMR, simple method of testing

    अशी महत्त्वपूर्ण माहिती इंडियन कांउन्सिल फॉम मेडिकल रिचर्सचे (ICMR) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.



    आरोग्य मंत्रालयाच्या दैनंदिन पत्रकार परिषदेत डॉ. भार्गव यांनी कोविड चाचण्यांबाबत धोरणाची माहिती दिली. ते म्हणाले, की चाचण्या वाढविण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. कारण त्यातून होम आयसोलेशनपासून अन्य वैद्यकीय व्यवस्था मार्गी लावता येतात.

    नागरिकांसाठी घरच्या घरी कोविड चाचण्या करण्याची पद्धत देखील सोपी आहे. ती ४ टप्प्यांमध्ये विभागली आहे. १. कोविड होम टेस्टिंग कीट विकत घेणे २. मोबाईल ऍप डाऊनलोड करणे ३. त्याच्यावर रजिट्रेशन करून घरच्या घरी चाचणी करणे

    ४. मोबाईलवर त्याची इमेज अपलोड करणे. यानंतर मोबाईलवरच रिझल्ट मिळेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर पेशंटचा डाटा सुरक्षित आणि गोपनीय असेल. तो आयसीएमआरच्या डाटाबेसशी कनेक्टेड राहील.

    संबंधित कोविड होम टेस्टिंग कीट येत्या ४ – ५ दिवसांमध्ये बाजारात उपलब्ध होईल, अशी माहिती त्यांनी दिली. या कीटसाठी एका कंपनीने सरकारकडे आधीच अर्ज करून ठेवला आहे. आणखी तीन कंपन्यांनी देखील तयारी दाखविली आहे. पुढच्या आठवड्यात यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण होईल.

    जास्तीत जास्त रॅपिड अँटिजंट टेस्ट व्हाव्यात करण त्यांचा रिझल्ट लवकर मिळतो. या महिनाअखेरपर्यंत आम्ही २५ लाख चाचण्यांचे टार्गेट ठेवले आहे. आणि जून महिनाअखेरपर्यंत ४५ लाथ चाचण्यांचे टार्गेट ठेवले आहे, अशी माहिती डॉ. बलराम भार्गव यांनी दिली.

     home testing kit will be available in the market in next 4-5 days; Important information of ICMR, simple method of testing

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे