वृत्तसंस्था
नवी दिल्ली – संसदेमध्ये विरोधकांनी जास्तीत जास्त अवघड आणि टोकदार प्रश्न विचारून सरकारला जेरीस आणावे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सरकार तयार आहे. पण त्याचवेळी विरोधकांनी सरकारची उत्तरे ऐकण्याची देखील तयारी ठेवावी. सरकारला उत्तरे देण्याची मूभा द्यावी, असे आवाहन आणि आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिले.Hit the government in Parliament, but also listen to the government’s answers… !!; Prime Minister Modi’s appeal and challenge to the opposition
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरूवात झाली. त्यापूर्वी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना मोदींनी विरोधकांना आवाहन केले आणि आव्हानही दिले.
ते म्हणाले, की सरकार विरोधकांचा एकही प्रश्न अनुत्तरीत ठेवणार नाही. पण विरोधकांनी संसदीय नियमांचे पालन करून शिस्त पाळून सरकारी उत्तरे ऐकून घेतली पाहिजेत. संसदेच्या सर्व पक्षांच्या सदस्यांनी नियमांचे पालन करून सरकारवर टीकेचा भडिमार केला तरी चालेल. आम्ही ते ऐकून घेऊ आणि मग उत्तरे देऊ. पण त्यावेळी विरोधकांनी देखील सरकारची उत्तरे ऐकून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे.
पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच एक गमतीशीर वक्तव्य करून संसदेत हलके फुलके वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, की देशातले ४० कोटी कोरोनाविरुध्दच्या लढाईत आता बाहुबली बनलेत. कारण कोरोनाची लस बाहूमध्ये म्हणजे दंडावर देण्यात येते.
बाहूमध्ये लस घेऊन ४० कोटी लोक बाहुबली बनलेत, असे विधान त्यांनी केले. कोरोनाने सगळे जग वेढले आहे. भारताने त्याविरोधात प्रभावी उपाययोजना केली आहे. त्यामुळे संसदेत या विषयावर अर्थपूर्ण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कोरोनावरच्या चर्चेला सरकार प्राधान्य देईल. सर्व खासदारांचे सरकार ऐकून घेईल. ज्या उणिवा राहिल्या असतील, त्या सुधारून पुढे जाण्याची सरकारची इच्छा आहे. संसदेतल्या पक्षनेत्यांनी आज सायंकाळी जरूर वेळ काढावा. मी त्यांना सगळी माहिती सांगेन. त्याची चर्चा देखील संसदेच्या दोन्ही सदनात करण्याची सरकारची तयारी आहे, असे मोदी म्हणाले.
Hit the government in Parliament, but also listen to the government’s answers… !!; Prime Minister Modi’s appeal and challenge to the opposition
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा बरळले, म्हणाले भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा भारतासाठी धोकादायक
- परदेशातून निधी घेऊन न्यूज क्लिक वेबसाईटकडून भारताची बदनामी, चांगले घडल्यावर वाईट दाखविण्याचा प्रयत्न
- मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांच्या विरोधानंतरही नवज्योतसिंग सिध्दू यांची पंजाब कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
- बसपाचा पुन्हा नारा, हाथी नहीं गणेश है, ब्रम्हा विष्णू महेश है, ब्राम्हण समाजाला जोडण्याचा प्रयत्न