• Download App
    Hindutva government was being formed in Bengal, the book "Political Agenda of Muslims" was published in Mumbai!! बंगालमध्ये हिंदुत्ववादी सरकार स्थापन होताना मुंबईत मात्र "मुसलमानों का सियासी अजेंडा" पुस्तकाचे प्रकाशन!!

    बंगालमध्ये हिंदुत्ववादी सरकार स्थापन होताना मुंबईत मात्र “मुसलमानों का सियासी अजेंडा” पुस्तकाचे प्रकाशन!!

    Bengal

    नाशिक : पश्चिम बंगाल मध्ये आज हिंदुत्ववादी सरकार स्थापन होत असतात मुंबईत एका कार्यक्रमात मुसलमानों का सियासी अजेंडा या पुस्तकाचे प्रकाशन झाले.Hindutva government was being formed in Bengal, the book “Political Agenda of Muslims” was published in Mumbai!!

    पश्चिम बंगाल मध्ये भाजपने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करून आज सरकार स्थापन केले. शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या बरोबर अन्य पाच मंत्र्यांनी देखील शपथ घेतली.



    – भाजप आणि मित्र पक्षांचे शक्तिप्रदर्शन

    कोलकात्याच्या ब्रिगेड ग्राउंड वर झालेल्या भव्य शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या नेत्यांसह भाजप शासित राज्यांचे सगळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हजर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे तिघेही तिथे उपस्थित होते. पश्चिम बंगाल मध्ये भाजपने ऐतिहासिक विजय‌ मिळविल्याच्या पार्श्वभूमीवर शपथविधीचा सोहळा देखील ऐतिहासिक ठरला. भाजप आणि मित्र पक्षांनी तिथे जबरदस्त शक्तिप्रदर्शन केले. सगळे कोलकता आणि पश्चिम बंगाल भगव्या रंगाने रंगविले. हा ऐतिहासिक सोहळा देशभर गाजला.

    – मुसलमानों का सियासी अजेंडा

    पण, एकीकडे पश्चिम बंगाल मध्ये भाजपचे हिंदुत्ववादी सरकार स्थापन होत असताना आज मुंबईत प्रबुद्ध भारत प्रकाशन संस्थेने “मुसलमानों का सियासी अजेंडा” या पुस्तकाचे प्रकाशन केले. प्रबुद्ध भारतचे संपादक प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकर आणि अन्य लोकांनी पुस्तकाचे प्रकाशन केले. फारूख अहमद यांनी “मुसलमानों का सियासी अजेंडा” हे पुस्तक लिहिले आहे.

    – भाजपा विरोधात भूमिका

    भारतातील इतिहासात जेव्हा जेव्हा मुसलमानांवर अन्याय आणि अत्याचार झाले, तेव्हा समाजातील विविध संघटना, चळवळी आणि पक्षांमधील अनेक लोकांनी भाजप आणि आरएसएसच्या विरोधात उभे राहत मुस्लिम समाजाच्या बाजूने भूमिका घेतली. या संघर्षाचे, समर्थनाचे आणि प्रतिकाराचे डॉक्युमेंटेशन होणे, तसेच ही माहिती पुढील पिढ्यांसाठी सर्वांना उपलब्ध होणे, हे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि मोठे पाऊल ठरणार आहे, असे सुजात आंबेडकर यांनी सांगितले.

    – मुस्लिम मतांची टक्केवारी वाढवा

    याच कार्यक्रमात सरफराज अहमद यांनी मुसलमानांच्या राजकारणाविषयी भाष्य केले. सध्याच्या आयडेंटिटी पॉलिटिक्स मध्ये राजकारणाच्या मूळ प्रवाहापासून बाजूला होऊन मुसलमान आपले लोकप्रतिनिधित्व वाढवू शकत नाहीत. जर मुसलमानांना विधानसभांमध्ये आपले प्रतिनिधित्व वाढवायचे असेल, तर त्यांना आंबेडकरवादी समुदायांसोबत उभे राहिले पाहिजे. मुस्लिमांची मतदानाची टक्केवारी वाढवली पाहिजे. तरच विधानसभांमध्ये मुस्लिमांचे टक्केवारी वाढेल, असे भाष्य सरफराज अहमद यांनी केले.

    Hindutva government was being formed in Bengal, the book “Political Agenda of Muslims” was published in Mumbai!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    China Admits : ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीनची पाकिस्तानला मदत; चीन आणि तुर्कस्तान दोघांनी मदत केल्याची कबुली

    DMK Congress : DMK खासदार लोकसभेत काँग्रेससोबत बसणार नाहीत; अध्यक्षांना पत्र लिहिले, TVK ला पाठिंबा दिल्याने नाराज

    CJI Surya Kant : CJI म्हणाले- मला ओरडून चेंबरमधून बाहेर काढले होते, त्याच न्यायाधीशांच्या सल्ल्यानुसार न्यायिक सेवा मुलाखत सोडली