प्रतिनिधी
इंदूर : “सोवळे ओवळे पूजा अर्चा, राहुलजींच्या भाषणापेक्षा मध्य प्रदेशात त्याचीच चर्चा”, असे घडले आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात आहे. इंदूरमध्ये जाहीर सभेत राहुल गांधींचे भाषण देखील झाले आहे. पण त्या भाषणापेक्षा राहुल गांधींनी उज्जैनच्या महांकालेश्वर मंदिरात जाऊन जी पूजा अर्चा केली, त्या पूजा अर्चेची आणि त्यांनी नेसलेल्या सोवळ्याचीच जास्त चर्चा मध्य प्रदेशात रंगली आहे. Hindudizing Congress : Rahul Gandhi prays in Mahakal temple in ujjain
राहुल गांधी हे भाजपच्या प्रखर हिंदुत्वाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे सौम्य हिंदूकरण करू इच्छितात. त्यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान केरळ आणि तामिळनाडू मध्ये मुस्लिम धर्मगुरू आणि ख्रिश्चन धर्मगुरूंशी चर्चा केली. त्यावेळी त्यांच्यावर जोरदार टीका झाली. पण भारत जोडो यात्रा जशी दक्षिणेतून उत्तरेकडे सरकली, तसे कर्नाटक, तेलंगण या राज्यांमध्ये त्यांनी विविध मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले. मठाधिपतींशी चर्चा केली. महाराष्ट्रात नांदेड मध्ये गुरुद्वारा मध्ये जाऊन पाठ केला. मध्य प्रदेशात नर्मदा आरती केली. नर्मदेच्या तीरावर ओंकाराची शाल ओढून ध्यानस्थ बसले आणि आता त्या पुढे जाऊन राहुल गांधींनी उज्जैनच्या महांकालेश्वर मंदिरात जाऊन सोवळे नेसून रुद्राभिषेक केला आहे. त्याचे फोटो त्यांनी स्वतःच्या ट्विटर हँडल वर आणि काँग्रेसच्या विविध सोशल मीडिया हँडलवर शेअर आहेत.
राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपच्या प्रखर हिंदुत्वाची टक्कर द्यायची आहे. त्यासाठी काँग्रेसचा जुना धर्मनिरपेक्ष फॉर्म्युला कामी येत नाही हे आता स्पष्ट आहे. सावरकरांचा मुद्दा देखील टीआरपी मिळवून देण्याच्या पलिकडे काँग्रेसला लाभ देण्याऐवजी काँग्रेसची हानी करतानाच दिसतो आहे. अशा स्थितीत धर्मनिरपेक्षता कामी येत नाही. सावरकरांचा मुद्दा राजकीय हानी करतो म्हणून मध्यम मार्ग म्हणून राहुल गांधींनी काँग्रेसच्या सौम्य हिंदूकरणाचा मार्ग पत्करल्याचे दिसत आहे.
त्यातही त्यांनी आधीच आपण दत्तात्रय गोत्री जानवेधारी ब्राह्मण असल्याचे जाहीर केलेच आहे. आता त्या पुढचे पाऊल टाकून नर्मदा आरती आणि सोवळे नेसून उज्जैनच्या महांकालेश्वर मंदिरात रुद्राभिषेक अशी धर्मनिष्ठ राजकीय कृती त्यांनी केली आहे.
इंदूरच्या सभेत राहुल गांधींचे भाषण जरूर झाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिबांची संपत्ती श्रीमंतांना देत असल्याची टीका केली. पण त्या भाषणा भाषणाकडे प्रसार माध्यमांचे फारसे लक्ष गेले नाही. सावरकरांचा मुद्दाही त्यांच्या भाषणात नव्हता. त्यामुळे प्रसार माध्यमांचे आणखीनच त्यांच्या भाषणाकडे दुर्लक्ष झाले. पण राहुल गांधींनी सोवळे नेसून महांकालेश्वर मंदिरात रुद्राभिषेक केल्याचे फोटो मात्र सगळीकडे प्रसिद्ध झाले आहेत.
Hindudizing Congress : Rahul Gandhi prays in Mahakal temple in ujjain
महत्वाच्या बातम्या
- मेट्रो कार शेड आरे मध्येच; कामाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; ठाकरे – पवार सरकारला फटकार
- मौत के सौदागर, नीच ते रावण गुजरात मध्ये काँग्रेसचा घसरता प्रचार प्रवास!
- सक्तीच्या धर्मांतराविरोधी कायद्याच्या दिशेने केंद्राचे पाऊल; सुप्रीम कोर्टात मांडली ठाम भूमिका