• Download App
    मणिपूर हिंसाचाराबाबत हिमंता सरमा यांचे मोठे विधान, काँग्रेसवर जोरदार निशाणा! Himanta Sarmas big statement about Manipur violence a strong target on Congress

    मणिपूर हिंसाचाराबाबत हिमंता सरमा यांचे मोठे विधान, काँग्रेसवर जोरदार निशाणा!

    गुवाहाटी येथे प्रसारमाध्यमांना मणिपूरमधील परिस्थितीबाबत दिली माहिती

    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी  :  आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी सांगितले की, मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस सुधारत आहे आणि एक आठवडा किंवा पुढील दहा दिवसांत आणखी सुधारणा होईल.  सरमा, एनडीएच्या ईशान्येकडील भाग ईशान्य लोकशाही आघाडीचे संयोजक देखील आहेत, त्यांनी दावा केला की मणिपूरमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, काँग्रेस मणिपूरचे रडगाणे  गात आहे आणि आता राज्यात शांतता निर्माण होत आहे. Himanta Sarmas big statement about Manipur violence a strong target on Congress

    सरमा म्हणाले की, राज्य सामान्य स्थितीकडे वाटचाल करत असताना काँग्रेस रडायला लागली आहे. मणिपूरमधील परिस्थिती अस्थिर असताना त्यांनी प्रयत्न करायला हवे होते. त्यावेळीही त्यांनी मणिपूरबाबत भाष्य केले नव्हते. तसेच, गुवाहाटी येथे प्रसारमाध्यमांना सांगितले की, राज्य सरकार आणि केंद्रीय गृह मंत्रालय शांतता प्रस्थापित करण्याचे काम करत आहेत. मणिपूरमधील परिस्थिती महिनाभरापूर्वीच्या परिस्थितीच्या तुलनेत बरीच सुधारली आहे.

    सरमा यांनी १० जून रोजी इंफाळला भेट दिली होती आणि त्यांनी मणिपूर मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग आणि इतर विविध संघटनांसोबत बैठक घेतली होती. मणिपूरशी संबंधित बैठका इंफाळ, गुवाहाटी आणि दिल्ली येथे होत आहेत. ईशान्य प्रदेशातील भाजपाच्या प्रमुख रणनीतीकारांपैकी एक असलेल्या सरमा यांनी ११ जून रोजी गुवाहाटी येथे कुकी समुदायातील काही उग्रवादी गटांच्या प्रतिनिधींचीही भेट घेतली होती.

    आसामच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या गुवाहाटी भेटीबाबत माध्यमांशी बोलताना कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन (केएनओ) चे प्रवक्ते सेलेन हाओकिप म्हणाले की चर्चा “अत्यंत सकारात्मक आणि योग्य दिशेने जात आहे”. तसेच,  हाओकीप म्हणाले होते, “आम्ही दोन्ही बाजूंनी युद्धविराम आणि कोणत्याही प्रकारची आक्रमकता थांबवण्याबाबत चर्चा केली. आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आसामचे मुख्यमंत्री हे संकट सोडवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. ते सकारात्मक पावले उचलतील.”

    Himanta Sarmas big statement about Manipur violence a strong target on Congress

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Aadhaar Vision : BCCIचे माजी अध्यक्ष आयएस बिंद्रा यांचे निधन; भारताला क्रिकेटची जागतिक महासत्ता बनवण्यात महत्त्वाची भूमिका

    आधारमध्ये फिंगरप्रिंटऐवजी चेहऱ्याने ओळखण्याची तयारी, दरमहा 100 कोटी प्रमाणीकरणाचे लक्ष्य

    धर्मेंद्र यांना पद्मविभूषण; अलका याज्ञिक यांना पद्मभूषण; रोहित शर्मा, रघुवीर खेडकर यांच्यासह महाराष्ट्रातील 11 जणांना पद्मश्री