• Download App
    कर्नाटकात पुन्हा हिजाब वाद : सुप्रीम कोर्टाच्या मनाई आदेशानंतरही पालकांचा शाळांमध्ये हिजाबचा आग्रह!!। Hijab controversy again in Karnataka: Parents insist on hijab in schools even after Supreme Court ban

    कर्नाटकात पुन्हा हिजाब वाद : सुप्रीम कोर्टाच्या मनाई आदेशानंतरही पालकांचा शाळांमध्ये हिजाबचा आग्रह!!

    वृत्तसंस्था

    मंड्या : कर्नाटक मध्ये हिजाबचा वाद पुन्हा एकदा रस्त्यावर आला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. जोपर्यंत आम्ही अंतिम आदेश देत नाही तोपर्यंत कोणताही धार्मिक पोषाख घालून शाळा अथवा महाविद्यालयात जाता येणार नाही, असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. Hijab controversy again in Karnataka: Parents insist on hijab in schools even after Supreme Court ban

    मात्र, सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतरही कर्नाटकात शाळांमध्ये पालक आपल्या मुलींना हिजाब घालूनच पाठवताना दिसत आहेत. तसेच उलट आपल्या मुलींना हिजाब घालूनच वर्गात प्रवेश द्यावा असा आग्रह धरतानाही दिसत आहेत.

    शाळा चालकांनी वर्गात हिजाब घालायला परवानगी नसल्याचे निदर्शनाला आणून दिल्यानंतरही पालकांचा हिजाब विषयीचा आग्रह कायम असल्याचा प्रकार मंड्या जिल्ह्यात घडला आहे. तेथे शिक्षिका विद्यार्थिनीला हिजाब घालून वर्गात प्रवेश करता येणार नाही, असे स्पष्ट सांगत आहेत. परंतु पालक मात्र हिजाब विषयी आग्रही असल्याचे चित्र दिसत आहे. शाळांमधल्या शिक्षकांशी वादही घालत आहेत. सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्याचा त्यांचा दावा आहे.

    परंतु प्रत्यक्षात सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जोपर्यंत अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत कोणाही विद्यार्थ्याला शाळेत धार्मिक पोशाख घालून येता येणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

    Hijab controversy again in Karnataka: Parents insist on hijab in schools even after Supreme Court ban

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य