विशेष प्रतिनिधी
लंडन – ब्रिटनमधील विद्यापीठांमध्ये यंदा भारतातील ३२०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या असून गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थीसंख्येत १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रिटनमधील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून हे प्रवेश देण्यात आले आहेत.
ब्रिटनमधील युनिव्हर्सिटीज् अँड कॉलेज ॲडमिशन सर्व्हिसने (यूसीएएस) प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे.
संसर्ग अधिक असल्याने ब्रिटनच्या ‘रेड लिस्ट’मध्ये भारताचा समावेश होता. त्यामुळे दहा दिवस सरकारी विलगीकरणात राहण्याचा १७५० पौंडांचा (एक लाख ८० हजार रुपये) अतिरिक्त खर्च त्यांना सोसावा लागत होता. येथील भारतीय विद्यार्थ्यांच्या संघटनेने याविरोधात आवाजही उठविला होता. त्यामुळेच सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पूनावाला यांनी अशा विद्यार्थ्यांसाठी १० कोटी रुपयांची मदतही केली होती. आता हा त्रास वाचणार आहे.
ब्रिटननेही काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतावरील प्रवासनिर्बंध कमी करत लाल यादीतून अंबर यादीत टाकले आहे. यामुळे ब्रिटनमध्ये जाऊन शिक्षण घेण्याचे नियोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आधीच्या नियमानुसार, भारतातून ब्रिटनमध्ये जाणाऱ्यांना १० दिवस सरकारी विलगीकरण केंद्रात सक्तीने रहावे लागत होते. त्यासाठीचा खर्चही त्यांनाच सोसावा लागत होता. आता मात्र, दहा दिवस घरीच विलगीकरणात राहण्यास परवानगी मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सेक्स गुलाम बनविण्यासाठी तालीबान अफगणिस्थानातील घराघरात मुली आणि विधवांचा घेतेय शोध
- अभिनेते प्रशांत दामले राज्य सरकारवर संतप्त, मोगॅँबो खुश हुआ म्हणत हॉटेल-मॉल्स मालकांचे अभिनंदन करत साधला निशाणा
- शिक्षणसम्राट मंत्र्यांना सामान्यांपेक्षा आपल्या संस्थांचीच काळजी, १५ टक्के फी कपातीवरून मंत्रीमंडळ बैठकीत खडाजंगी
- Maharashtra Unlock : 15 ऑगस्टपासून लॉकडाऊन मधून ‘स्वातंत्र्य’; टास्क फोर्सचा शाळा, महाविद्यालयं सुरू करण्यास विरोध