• Download App
    देशात परभणीत उच्चांकी पेट्रोलचा दर; १२१ रुपये लिटर, राजस्थानात १२० रुपये|high petrol rates in the Parbhani; Rs 121 per liter while Rs 120 in Rajasthan

    देशात परभणीत उच्चांकी पेट्रोलचा दर; १२१ रुपये लिटर, राजस्थानात १२० रुपये

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात महाराष्ट्रातील परभणीत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. गेल्या दोन आठवड्यात पेट्रोल, डिझेलचे दर १२ वेळा वाढले आहेत.  high petrol rates in the Parbhani; Rs 121 per liter while Rs 120 in Rajasthan

    एकूण दर ८ रुपये प्रति लिटरने वाढले.परभणीमध्ये सामान्य पेट्रोलची किंमत १२१.३८ रुपये तर, डिझेलची किंमत १०३. ९७ रुपये आहे. दरम्यान, राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्येही इंधन दरात प्रचंड वाढ झाली असून पेट्रोल १२०.७३ रुपये आणि डिझेल १०३.३० रुपये दराने  विकले जात आहे.



    परभणीत इंधनाची किंमत जास्त आहे. कारण ते येथे ३४०किलोमीटरच्या मनमाड डेपोतून ते आणले जाते.औरंगाबादमध्ये डेपोची मागणी केली  आहे, ज्यामुळे इंधनाचे दर प्रति लिटर २ रुपये कमी होतील, असे परभणी पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमोल भेडसुरकर यांनी  सांगितले.

    इंधन जीएसटीच्या कक्षेत आणल्यास लोकांना जास्तीत जास्त दिलासा मिळेल, असेही ते म्हणाले. गेल्या वर्षी ३ नोव्हेंबर रोजी केंद्राने देशभरातील किरकोळ किमती कमी करण्यासाठी पेट्रोलवर प्रति लिटर ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपये  प्रति लिटर उत्पादन शुल्कात कपात केली होती. यानंतर, अनेक राज्य सरकारांनी लोकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी केला होता.

    high petrol rates in the Parbhani; Rs 121 per liter while Rs 120 in Rajasthan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप