• Download App
    मराठी संशोधकाने बनविले बॉम्बरोधक हेल्मेट; भारतीय लष्करी जवान, कमांडोना नवे कवच |Helmet made by Marathi researcher for military soldiers

    मराठी संशोधकाने बनविले बॉम्बरोधक हेल्मेट; भारतीय लष्करी जवान, कमांडोना नवे कवच

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : बॉम्बरोधक हेल्मेट बनवण्याची कमाल एका मराठी संशोधकाने केली आहे. शैलेश गणपुले असे त्यांचे नाव असून ते उत्तराखंडमधील आयआयटी रुरकीमध्ये प्राध्यापक आहेत. Helmet made by Marathi researcher for military soldiers

    लष्करी जवान आणि कमांडोंना युद्धभूमीवर गोळ्यांचा वर्षाव आणि जीवघेण्या स्फोटकांचा सामना करावा लागतो. डोक्याला गोळी लागू नये म्हणून संरक्षक हेल्मेट असतेच, पण स्फोटाच्या दणक्याने डोक्याला गंभीर इजा होते. कधीकधी मृत्यूही ओढवतो. यापासून संरक्षण करणारे हे हेल्मेट आहे.



    प्रा. शैलेश गणपुले हे मूळचे महाराष्ट्रातील आहेत. आयआयटी रुरकीमध्ये मेकॅनिकल अॅन्ड इन्डस्ट्रियल इंजिनीअरिंग विभागात ते प्राध्यापक आहेत. बॉम्बरोधक हेल्मेट बनवल्याबद्दल त्यांचा ‘एनएसजी काऊंटर-आयईडी अॅन्ड काऊंटर-टेररिझम इनोव्हेटर पुरस्कार 2021’ देऊन नुकताच गौरव करण्यात आला.

    हरियाणातील राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या मुख्यालयात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सध्याचे लष्करी हेल्मेट हे जवानांचे बंदुकीच्या गोळीपासून संरक्षण करू शकतात, परंतु स्फोटापासून संरक्षण करण्यासाठी ते पुरेसे नाहीत.

    प्रा. गणपुले यांनी जवानांसाठी बनवलेले बॉम्बरोधक हेल्मेट ही त्याच पारंपरिक हेल्मेटची आधुनिक आवृत्ती आहे. आयईडी स्फोटानंतर निर्माण होणाऱ्या शक्तीशाली लहरींपासून डोक्याचे संरक्षण करण्यास ते सक्षम ठरले आहे.

    Helmet made by Marathi researcher for military soldiers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मार्क-2 क्षेपणास्त्राचा संरक्षण ताफ्यात समावेश

    कुकी दहशतवद्यांना मणिपूरमध्ये CRPF कॅम्पला केले लक्ष्य ; बॉम्ब फेकले, दोन जवान शहीद

    काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, अरविंदर सिंग लवली यांचा दिल्ली अध्यक्षपदाचा राजीनामा