पोलीस आणि वैद्यकीय पथक रवाना झाले आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात ( Pune ) एका हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. बावधन बुद्रुक गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलीस आणि वैद्यकीय पथक रवाना झाले आहे. DGCAच्या मते, हेरिटेज एव्हिएशनचे VT-EVV नोंदणी असलेले ऑगस्टा 109 हेलिकॉप्टर पुण्यातील ऑक्सफर्ड हेलिपॅडपासून सुमारे 20 एनएम अंतरावर क्रॅश झाले.
डीजीसीएने सांगितले की, हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि एक एएमई होते, तर प्रवासी नव्हते. हेलिकॉप्टरमधील तिन्ही क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत हे वैमानिक होते. सकाळी ७ वाजता हेलिकॉप्टरने उड्डाण केले. या भागात दाट धुक्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू आहे. हिंजवडी पोलीस ठाणे (पिंपरी चिंचवड पोलीस) आणि विमान वाहतूक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरच्या देखभालीचे काम सुरू होते.
याआधी ऑगस्ट महिन्यातही पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली होती, त्यात चार जण जखमी झाले होते. हेलिकॉप्टरने मुंबईतील जुहू येथून हैदराबादच्या दिशेने उड्डाण केले. याचदरम्यान, खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे पुण्यातील पौड परिसरात हेलिकॉप्टरला अपघात झाला. अपघातात बळी पडलेले हेलिकॉप्टर ग्लोबल वेक्ट्रा हेलिकॉप्टर या खासगी कंपनीचे होते. हे हेलिकॉप्टर कमी अंतराच्या प्रवासासाठी वापरले जात होते.
Helicopter crash in Pune three dead police and medical team dispatched
महत्वाच्या बातम्या
- Dushyant Chautala : हरियाणा दुष्यंत चौटाला अन् खासदार चंद्रशेखर यांच्या ताफ्यावर दगडफेक
- नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल
- Tirupati Laddu : तिरुपती लाडूतील ‘भेसळयुक्त तुपा’बाबत SITच्या तपासाला स्थगिती
- Amit shah : माध्यमांनी चालवला 2029 चा बोलबाला; प्रत्यक्षात अमित शाहांनी दिला व्होट जिहादवर मात करायचा फॉर्म्युला!!