गोवा ते कर्नाटकला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 66 वरील अवजड वाहतूक विस्कळीत झाली
विशेष प्रतिनिधी
कन्नड : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, कर्नाटकातील ( Karnataka ) उत्तर कन्नड जिल्ह्यात काली नदीवर बांधलेला पूल तुटला आहे. त्यामुळे या पुलावरून जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरा कन्नड जिल्ह्यातील काली नदीवरील पूल बुधवारी पहाटे कोसळला, ज्यामुळे गोवा ते कर्नाटकला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 66 वरील अवजड वाहतूक विस्कळीत झाली.
कारवार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास या पुलावरून ट्रक जात असताना पुलाचा मोठा भाग कोसळला, त्यामुळे वाहन चालक नदीत पडून जखमी झाला.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दशकभरापूर्वी नवीन पूल बांधल्यानंतर या पुलाचा वापर गोव्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी करण्यात आला. तामिळनाडू येथील बाला मुरुगन असे जखमी ट्रक चालकाचे नाव आहे. कारवारला जाणारा ट्रक पाण्यात पडल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर रात्रीच्या गस्ती पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली.
पोलिस अधीक्षक म्हणाले, “आमच्या रात्रीच्या गस्ती पथकाने कोसळलेला पूल पाहिला आणि नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नदीत एक ट्रक होता आणि जखमी चालक वाहनाच्या वर होता. आमच्या टीमसह स्थानिक मच्छिमारांनी चालकाला वाचवण्यात यश मिळविले. .” ते म्हणाले, “त्याला कारवार इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक चालकाची प्रकृती स्थिर असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.”
Heavy rains in Karnataka bridge over Kali river broke
महत्वाच्या बातम्या
- दुसऱ्या मुक्ती संग्रामाचे “नोबेल प्रलाप”; वंगबंधू म्युजियम + इंदिरा गांधी कल्चरल सेंटर आगीत खाक!!
- Dhirendra Shastri : बांगलादेश हिंसाचारावर बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
- Sheikh Hasina : शेख हसीना यांना आणखी एक धक्का, ब्रिटननंतर अमेरिकेनेही त्यांना आश्रय नाकारला!
- CM Eknath Shinde : प्रत्येक गावात मान्सूनपूर्व सूचना देणारी प्रणाली तात्काळ कार्यान्वित करा – मुख्यमंत्री शिंदे