विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा जबर तडाखा बसला आहे. दुसरीकडे त्रिपुरामध्ये अचानक पूरस्थिती निर्माण झाल्याने दोन हजार लोकांना शिबिरांमध्ये हलविण्यात आले आहे.Heat wave in North India
ईशान्येकडील राज्यांना अतिवृष्टीने झोडपून काढले असून रस्ते आणि ऊर्जा पुरवठा करणारी यंत्रणा आणि पिकांचेही यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तर पंजाब आणि हरियानामध्ये ४० डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. राजस्थानातील चुरू येथील पारा ४३.७ अंशांवर गेला होता, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
हरियानातील गुडगाव येथे ४३.५ अंश एवढ्या तापमानाची नोंद झाली. हा भाग दिल्ली परिसरामध्ये येतो.दिल्लीवर काळे ढग दाटल्याने थंड वारे वाहू लागले होते, यामुळे उष्णतेमध्ये होरपळणाऱ्या राजधानीवासीयांना मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान हा दिलासाही फार काळ टिकण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पश्चिहम बंगाल, सिक्कीम, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांमध्ये अनेक ठिकाणांवर पाऊस पडला. या अतिवृष्टीमुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Heat wave in North India
महत्त्वाच्या बातम्या
- वा चित्राताई! पक्षभेद विसरून महिला नेत्याच्या पाठीमागे राहिल्या उभ्या, राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांंना दिला दिलासा
- Mango diplomacy failed : आंब्याची फोड लागली गोड, आणीक तोड बाई आणीक तोड…!!
- अधीर रंजन चौधरी यांचा बळी देऊन कॉँग्रेस साधणार ममतांशी सलगी, लोकसभा नेतेपदावरून हटविणार
- शासकीय नोकरीपलीकडेही एक जग आहे.. मिळणारी संधी काही सर्वोच्च नाही..!