वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्ली हायकोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्स अॅप आणि फेसबुकला चांगलाच झटका दिला आहे. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या (सीसीआय) तपासाविरोधात हस्तक्षेप करण्याच्या कंपन्यांच्या मागणीशी संबंधित याचिका हायकोर्टाच्या डबल बेंचने फेटाळली आहे.HC rejects WhatsApp, Facebook plea: It sought interference in Competition Commission of India probe
आता व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा सीसीआय तपास सुरूच राहील. गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच सीसीआयने व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी धोरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर याविरोधात कंपन्या न्यायालयात गेल्या. न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या नेतृत्वातील पीठ म्हणाले, मागणीत काहीच दम नाही. हा आदेश २५ जुलैला राखून ठेवल्यानंतर गुरुवारी निर्णय देण्यात आला.
डेटा संरक्षण विधेयक समोर येईपर्यंत आम्ही प्रायव्हसी धोरण लागू करणार नाही, असे सुनावणीदरम्यान व्हॉट्सअॅप-फेसबुकने सांगितले होते. तसेच संसदीय कायद्याचे पालन करण्याचे आश्वासनही दिले होते. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एन. वेंकटरमण म्हणाले होते, व्हॉट्सअॅपच्या नव्या गोपनीयता धोरणात याचा न्यायिक प्रक्रियेचा वापर करत रोखता येणार नाही. कायद्यानुसार हा तपास कुणीच रोखू शकत नाही.
HC rejects WhatsApp, Facebook plea: It sought interference in Competition Commission of India probe
महत्वाच्या बातम्या
- झारखंडमध्ये सत्तासंकट : मुख्यमंत्री सोरेन यांची आमदारकी रद्द, तरीही पुन्हा तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता
- मराठा आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
- महाराष्ट्राच्या १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत एसटी प्रवासाचा लाभ!!
- महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ठाकरे सरकारचा प्रभाग पुनर्रचनेचा डाव; फडणवीसांचा गौप्यस्फोट