• Download App
    मुख्यमंत्री खट्टर यांना विरोध करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज, राहुल गांधी म्हणाले - फिर खून बहाया किसान का! । haryana police lathicharge On Protesting farmers Rahul Gandhi Reaction Via Tweet

    मुख्यमंत्री खट्टर यांना विरोध करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज, राहुल गांधी म्हणाले – फिर खून बहाया किसान का!

    haryana police lathicharge : हरियाणात पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या शनिवारी येथे कर्नालमधील घरौंदा टोलवर आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी विरोध केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या लाठीचार्जच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने सर्व शेतकऱ्यांना सायंकाळी ५.०० पर्यंत सर्व टोल आणि महामार्ग जाम करण्याचे आवाहन केले आहे. haryana police lathicharge On Protesting farmers Rahul Gandhi Reaction Via Tweet


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : हरियाणात पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या शनिवारी येथे कर्नालमधील घरौंदा टोलवर आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी विरोध केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या लाठीचार्जच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने सर्व शेतकऱ्यांना सायंकाळी ५.०० पर्यंत सर्व टोल आणि महामार्ग जाम करण्याचे आवाहन केले आहे.

    वास्तविक, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर कर्नालमधील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमाच्या निषेधार्थ शेतकरी घरौंदा, कर्नाल येथील टोलवर जमले. शेतकरी कृषी कायद्यांना विरोध करत होते. माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी शेतकऱ्यांना महामार्ग रिकामा करण्यास सांगितले. बराच वेळ बोलूनही शेतकरी महामार्गावर अडून राहिले होते.

    राहुल गांधी म्हणाले – फिर खून बहाया किसान का!

    आंदोलन आणखी पेटणार

    शेतकऱ्यांना महामार्गावरून हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप आहे. यादरम्यान, अनेक शेतकरी आंदोलकांना दुखापतही झाली आहे. त्याचवेळी संयुक्त किसान मोर्चाचे डॉ. दर्शन पाल म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना दुखापत झाली, ती जर जास्त गंभीर असेल तर आंदोलन तीव्र होईल.

    दर्शन पाल यांनी सर्व शेतकऱ्यांना लाठीचार्जच्या निषेधार्थ राज्यातील सर्व महामार्ग आणि टोल नाके बंद करण्याचे आवाहन केली आहे. ते म्हणाले, शेकडो शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. शेतकरी शांततेने आंदोलन करत असल्याचा दावा त्यांनी केला. तरीही त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आल्याचे ते म्हणाले.

    राकेश टिकैत म्हणाले – 5 वाजेपर्यंत सर्व रस्ते जाम ठेवा

    राकेश टिकैत यांनी ट्वीट केले, हरियाणाच्या कर्नालमध्ये लाठीचार्जच्या निषेधार्थ, आज संध्याकाळी 5.00 पर्यंत सर्व रस्ते जाम राहतील. 5 सप्टेंबर रोजी मुझफ्फरनगरमध्ये आयोजित किसान महापंचायत हे सरकारचे लक्ष्य आहे. त्यांची इच्छा आहे की, हरयाणातील लोकांना महापंचायतीत जाऊ नये. तुम्ही सर्व या बाबींकडे लक्ष द्या.

    haryana police lathicharge On Protesting farmers Rahul Gandhi Reaction Via Tweet

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मार्क-2 क्षेपणास्त्राचा संरक्षण ताफ्यात समावेश

    कुकी दहशतवद्यांना मणिपूरमध्ये CRPF कॅम्पला केले लक्ष्य ; बॉम्ब फेकले, दोन जवान शहीद

    काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, अरविंदर सिंग लवली यांचा दिल्ली अध्यक्षपदाचा राजीनामा