• Download App
    भीषण अपघात : हरयाणात रस्त्यावर बसलेल्या महिला शेतकरी आंदोलकांना ट्रकने चिरडले, तीन वृद्ध महिलांचा मृत्यू । Haryana bahadurgarh over speeding truck crushed farmer protesters three women died

    भीषण अपघात : हरयाणात रस्त्यावर बसलेल्या महिला शेतकरी आंदोलकांना ट्रकने चिरडले, तीन वृद्ध महिलांचा मृत्यू

    हरियाणाच्या बहादूरगडमध्ये गुरुवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. एका भरधाव ट्रकने महिला शेतकरी आंदोलकांना चिरडले. या अपघातात तीन वृद्ध महिलांचा मृत्यू झाला असून तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत. या तीन मृत आंदोलक महिला पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. त्या शेतकरी साखळी आंदोलनानुसार घरी जाणार होत्या. Haryana bahadurgarh over speeding truck crushed farmer protesters three women died


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : हरियाणाच्या बहादूरगडमध्ये गुरुवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. एका भरधाव ट्रकने महिला शेतकरी आंदोलकांना चिरडले. या अपघातात तीन वृद्ध महिलांचा मृत्यू झाला असून तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत. या तीन मृत आंदोलक महिला पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. त्या शेतकरी साखळी आंदोलनानुसार घरी जाणार होत्या.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झज्जर रोडवर सकाळी 6.30 च्या सुमारास हा अपघात झाला. या वृद्ध महिला दुभाजकावर बसल्या होत्या, तेव्हा एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर एकीचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या इतर तीन महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.



    अपघातानंतर ट्रक चालक फरार

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिला आज सकाळी 6 वाजता बहादूरगडमधील दुभाजकावर बसून घरी जाण्यासाठी ऑटोची वाट पाहत होत्या. त्यानंतर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडले, ज्यामध्ये तीन वृद्ध शेतकरी महिलांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबर 2020 पासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे शेतकरी गेल्या एक वर्षापासून शेतीविषयक कायदे परत करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी उभे आहेत.

    या तिन्ही महिलांचाही या आंदोलनाशी संबंध होता. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. संयुक्त किसान मोर्चा (SKM) या तीनही कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 11 महिने पूर्ण होत आहेत.

    Haryana bahadurgarh over speeding truck crushed farmer protesters three women died

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!