विशेष प्रतिनिधी
डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या खटिमा मतदारसंघात कॉँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर अॅसिड हल्ला करण्याचा डाव आखण्यात आला आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि कॉँग्रेसचे नेते हरिश रावत यांनी केल आहे.Harish Rawat’s allegation of acid attack on Congress’ Parivartan Yatra
रावत यांनी दोन स्त्रोत्रांचा हवाला देऊन म्हटले आहे की, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या खटिमा मतदारसंघात परिवर्तन यात्रा पोहोचल्यावर अॅसिड हल्ला होणार होता. हे अत्यंत भयानक आहे. आमच्या नेत्यांना अॅसिड हल्याने लक्ष्य केले जाऊ शकते. शाईच्या बाटलीमध्ये अॅसिड मिसळून हल्ला केला जाऊ शकतो.
हा हल्ला झाल्यास उत्तराखंडच्या राजकारणावर डाग पडेल. राजकारणात स्पर्धा असली पाहिजे; निरोगी स्पर्धा, वैचारिक स्पर्धा आणि लोकांसाठी काम करण्याची स्पर्धा. पण जर काही लोक विद्यार्थ्यांच्या गटाला किंवा इतर लोकांना अॅसिड हल्यासारखे कृत्य करण्यासाठी प्रोत्साहन देत असतील तर राजकारण अत्यंत नीच पातळीवर गेले असेच म्हणावे लागेल, असेही रावत यांनी म्हटले आहे.
Harish Rawat’s allegation of acid attack on Congress’ Parivartan Yatra
महत्त्वाच्या बातम्या
- पीएफच्या व्याजावर आता प्राप्तीकर, नोकरदारांना ठेवावी लागणार दोन स्वतंत्र पीएफ खाती
- एकनाथ खडसे यांचा पाय खोलात, जावयाला मनी लॉड्रिंगअंतर्गत गुन्ह्यातील जामीन अर्ज फेटाळला
- आयफोन १२ प्रो स्मार्टफोनसाठी सीबीआय अधिकाºयाने फोडला अनिल देशमुख यांच्याशी संबंधित अहवाल!
- राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या